मराठी तसेच हिंदी इंडस्ट्रीतील लोकप्रिय अभिनेत्री गिरिजा ओक सोशल मीडियावर खूपच सक्रिय असते. ती वारंवार आपल्या दैनंदिन जीवनातील क्षण, कामाचे अपडेट्स आणि वैयक्तिक आठवणी चाहत्यांसोबत शेअर करत असते. अलीकडेच तिचा निळ्या साडीतील एका मुलाखतीतील फोटो व्हायरल होऊन ‘नॅशनल क्रश’ म्हणून चर्चेत आली होती. त्यानंतर आता गिरिजाने आपल्या आईच्या वाढदिवसानिमित्त इंस्टाग्रामवर खास पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये गिरिजाने आईसोबतचे पारंपरिक लूकमधील फोटो तसेच लहानपणातील एक गोंडस फोटो शेअर केला आहे. दोघींनी साडी आणि नथ परिधान केलेल्या या फोटोमध्ये त्यांचे प्रेमळ नाते दिसून येते. गिरिजाने या पोस्टला दिलेल्या कॅप्शनमध्ये भावूकपणे लिहिले आहे, “मी जर ५ टक्केसुद्धा माझ्या आईसारखी आई आणि स्त्री बनू शकले तर माझ्यासाठी ती खूप मोठी गोष्ट असेल. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा आई, तू खूप कमाल आहेस.” या कॅप्शनमधून गिरिजाने आपल्या आईचे भरभरून कौतुक केले आहे. View this post on Instagram A post shared by Girija Oak Godbole (@girijaoakgodbole) या पोस्टवर चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात कमेंट्स करत गिरिजा आणि तिच्या आईला शुभेच्छा दिल्या आहेत. गिरिजा अनेक मुलाखतींमध्येही आपल्या आईबद्दल बोलत असते आणि बालपणातील आठवणी शेअर करत असते. दरम्यान, गिरिजा ओकने मराठी मालिका, चित्रपट, वेब सीरिज तसेच हिंदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ‘तारे जमीन पर’, ‘शोर इन द सिटी’, ‘जवान’ यांसारख्या चित्रपटांमध्ये तिच्या भूमिका लक्षात राहिल्या आहेत. नुकतीच तिची ‘द पर्फेक्ट फॅमिली’ ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आली असून, तिच्या सहज आणि सुंदर अभिनयाची चाहत्यांकडून प्रशंसा होत आहे. गिरिजाचा सोशल मीडियावर मोठा फॅन फॉलोइंग असून, ती याच्या माध्यमातून चाहत्यांशी जोडलेली राहते.