गिलानींचे दिल्लीतील घर जप्त

नवी दिल्ली – आयकर विभागाने फुटीवादी काश्‍मीरी नेता सय्यद अलि शाह गिलानी यांचे दिल्लीतील घर करचुकवेगीरीच्या आरोपाखाली जप्त केले आहे. त्यांनी 3 कोटी 62 लाख रूपयांचा आयकर चुकवल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. गिलानी यांचे हे घर सदनिकेच्या स्वरूपात असून त्यांची ही सदनिका दक्षिण दिल्लीच्या मालवीय नगर येथे आहे.

सन 1996-97 ते 2001-2002 या काळात त्यांच्यावर आयकराची एकूण 3 कोटी 62 लाख 62 हजार 160 रूपयांची थकबाकी आहे. त्यावर आयकर कायद्याच्या कलम 222 अन्वये ही कारवाई आयकर विभागाने केली आहे. गिलानी यांच्याकडे सतरा वर्षांपुर्वीच्या एका प्रकरणात दहा हजार अमेरिकन डॉलर्सचे चलन जवळ बाळगल्याचे एक प्रकरण दाखल होते. त्यातही त्यांना 14 लाख 40 हजार रूपयांचा दंड करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.