प्रभात वृत्तसेवा पुणे – विविध संकेतस्थळे आणि प्लॅटफॉर्मवर काम करणाऱ्या पुण्यातील गिग कामगारांपैकी ६४ टक्के कामगारांना हे काम सोडून कौशल्यांवर आधारित जास्त पगार देणारी स्थिर नोकरी करण्याची इच्छा असल्याचे नुकत्याच झालेल्या एका अहवालात समोर आले आहे. पुणेस्थित रूबल फाउंडेशन आणि सेंटर फॉर युथ डेव्हलपमेंट आणि अक्टिव्हीटी इंडियाकडून पुण्यातील गिग कामगारांवर एक सर्वेक्षण करण्यात आले आहे. या क्षेत्रात बहुतांश कामगार पुरुष असून, त्यात तरुणांचा जास्त समावेश मोठा आहे. हे तरुण किमान शिक्षण असलेल्या वर्गातून येत असल्याचेही या सर्वेक्षणात दिसते. गेल्या काही वर्षांत गिग कामगारांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. फक्त १० मिनिटात डिलिव्हरी देण्याच्या आश्वासनावर चालणारी ही अर्थव्यवस्था यात काम करणाऱ्या कामगारांसाठी अनेक आव्हाने घेऊन आली आहे. यात काम करणाऱ्या कामगारांना उपजीविकेचे साधन जरी या व्यवस्थेत मिळाले असले, तरी सामाजिक सुरक्षा, रोजगाराची हमी आणि इतर अनेक गोष्टींपासून ते वंचित असल्याचे अहवालातून पुन्हा अधोरेखित होत आहे. पुण्यातील गिग वर्कर्स – ९५ टक्के पुरुष, ५ टक्के महिला – ७५ टक्के २२ ते ३५ वयोगटांतील – ३. ७१ टक्केंचे शिक्षण १० वी किंवा १२ वी – ५० टक्के अविवाहित, ४८ टक्के विवाहित – ८९ टक्के महाविद्यालयीन कोर्समध्ये नोंदणीकृत नाहीत कामगारांची सद्यस्थिती – वेळेवर डिलिव्हरी करण्याचा ताण – धोकादायक गाडी पद्धतीने गाडी चालवणे – स्वतः करावा लागतो उपचाराचा खर्च – थकवा, पाठीचे दुखणे, ताण – बहुतांशांकडे नाही वैद्यकीय विमा – नोकरी जाण्याच्या भीतीने मानसिक ताण