मंचरमध्ये करोना योद्‌ध्यांना घोष मानवंदना

मंचर -राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने मंचर येथील उपजिल्हा रुग्णालय आणि ग्रामपंचायत येथे करोना योद्‌ध्यांना घोष मानवंदना देण्यात आली.

मानवंदना देतेवेळी आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी तसेच ग्रामपंचायत कर्मचारी भारावून गेले. आजवर केलेल्या सेवेचा संघाने केलेला गौरव आयुष्यभर लक्षात राहील, अशी भावना मंचर उपजिल्हा रुग्णालयाच्या अधीक्षिका चंदाराणी पाटील यांनी व्यक्‍त केली.

मानवंदनेवेळी पोलीस उपनिरीक्षक अर्जून शिंदे, सरपंच दत्ता गांजाळे, ग्रामविकास अधिकारी सचिन उंडे, उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधिकारी डॉ. गणेश पवार, डॉ. सचिन कांबळे, डॉ. आरती भारती यांनी आपल्या भावनांना वाट करून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.