DND APP : बऱ्याच लोकांनी त्यांच्या फोन नंबरवर डू नॉट डिस्टर्ब चालू केले आहे पण तरीही अनोळखी नंबरवरून येणारे कॉल थांबत नाहीत. एका अहवालानुसार, भारतातील प्रत्येक मोबाईल युजरला दररोज किमान 6 अज्ञात क्रमांकांवरून कॉल येतात. या समस्येवर मात करण्यासाठी, भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण (TRAI) ने DND ॲप सादर केले आहे खूप कमी लोकांना याबद्दल माहिती आहे. या ॲपच्या मदतीने तुम्ही अनोळखी नंबरवरून येणारे कॉल आणि मेसेज ब्लॉक करू शकता. यामुळे तुम्हाला डिस्टब करणाऱ्या कॉल्सपासून सुटका होईल. शिवाय हे ॲप अधिकृत असल्याने यापासून कोणताही डेटा चोरीला जाण्याचा किंवा इतर गोष्टींचा धोका उध्दभवणार नाही. DND च्या नवीन आवृत्तीमध्ये काय बदलले आहे? काही दिवसांपूर्वीच ट्रायने सांगितले की, DND ॲपच्या उणिवा दूर करण्यासाठी बरेच काम केले आहे. यापूर्वी DND ॲप्समध्ये अनेक बॅग्ज होते जे आता दुरुस्त करण्यात आले आहेत. आता या ॲपमध्ये कोणतेही बॅग्ज नाहीत त्यामुळे ते आता सहज वापरता येतो. TRAI DND ॲप कसे वापरावे? तुमच्याकडे अँड्रॉईड फोन असल्यास गुगल प्ले स्टोअरवरून TRAI DND 3.0 ॲप डाउनलोड करा. ॲप इन्स्टॉल केल्यानंतर ओटीपीद्वारे लॉग इन करा. एकदा लॉग इन केल्यानंतर, DND ॲप तुमच्या नंबरवर काम करण्यास सुरवात करेल. यानंतर नको असलेले कॉल आणि मेसेज ब्लॉक होतील. या ॲपच्या मदतीने तुम्ही कोणत्याही कॉल किंवा कोणत्याही नंबरची तक्रार देखील करू शकाल.