पुणे – सन 1827 पासून सतत नाविन्याचा शोध घेत आपल्या ग्राहकांना वैविध्यपूर्ण दागिन्यांचे असंख्य प्रकार सादर करणारे नांव म्हणजे “चंदूकाका सराफ ऍन्ड सन्स प्रा.लि.’ याच परंपरेतून आता या पेढीने पारंपारिकतेला नाविन्याची जोड देत ट्रेंडी डिझाईन्सचा सुरेख संगम आपल्या ग्राहकांसाठी आयोजित केला आहे.
दरम्यान, सध्याच्या लग्नसराईच्या काळात तुम्ही जर काही स्पेशल, इतरांपेक्षा वेगळे दागिने घेण्याचा विचार करत असाल तर चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि तर्फे ‘एक्सक्लुझिव्ह डायमंड ज्वेलरी एक्झिबिशन’ हे कॅम्पेन तुमच्यासाठीच सुरु होत आहे. या अंतर्गत तुम्ही विवाहप्रसंगी खास ठरणारे हिऱ्यांचे नावीन्यपूर्ण अलंकार खरेदी करू शकता.
‘एक्सक्लुझिव्ह डायमंड ज्वेलरी एक्झिबिशन’ दि. 13 ते 16 एप्रिल 2023, स. 10.30 ते रा. 8.30. चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स् प्रा. लि., च्या पुणे-सातारा रोड, वाळवेकर लॉन्सशेजारी आणि फर्निशिंग मॉलशेजारी, पौड रोड, कोथरूड या ठिकाणी आयोजित केलं आहे. या ठिकाणी तुम्ही हिऱ्यांच्या अगणित डिझाईन्समधून तुमचा आवडता दागिना खरेदी करू शकता.
तसेच, हिऱ्यांच्या दागिन्यांच्या घडणावळीवर 100% पर्यंत सवलत आणि आंतरराष्ट्रीय लॅब सर्टिफिकेट, गुणवत्तेची खात्री, लाईफटाईम रिपेअरिंग सर्व्हिस आणि 100% एक्सचेंज पॉलिसी देखील तुम्हाला भेटू शकते. लग्नसराईच्या या काळात अत्यंत लोकप्रिय ठरत असलेल्या ‘वेडिंग मोमेंट्स कलेक्शन’ मध्ये सोन्याची, हिऱ्यांची आणि कुंदन दागिन्यांची अनोखी श्रेणी देखील तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळेल. त्यामुळे चंदुकाका सराफ ॲन्ड सन्स्च्या शोरूमला आवर्जून भेट द्या.