पुणे – डेहराडून येथील राष्ट्रीय इंडियन मिलिटरी कॉलेज (आरआयएमसी) मधील इयत्ता आठवीच्या प्रवेशासाठी येत्या 3 जून रोजी प्रवेशपात्रता परीक्षा घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने याचे आयोजन करण्यात आले आहे. ही माहिती उपायुक्त संजयकुमार राठोड यांनी दिली. अर्ज कसा मागवावा, कोठे सादर करावा प्रवेशपात्रता परीक्षेसाठी ऑफलाइन अथवा ऑनलाइन पद्धतीने पैसे भरुन डेहराडून येथून अर्ज मागविता येणार आहे. अर्ज परिपूर्ण भरुन कागदपत्रांसह महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या पुणे कार्यालयात सादर करणे आवश्यक आहे. अर्ज सादर करण्यासाठी 15 एप्रिलपर्यंतची मुदत आहे. स्पीड पोस्टाने अथवा समक्ष अर्ज सादर करता येणार आहे. प्रवेश पात्रता इयत्ता सातवीच्या वर्गात शिकत असलेल्या किंवा सातवी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थी, विद्यार्थीनिंना प्रवेश पात्रता परीक्षेला बसता येणार आहे. अकरा वर्षे सहा महिनेपेक्षा कमी व तेरा वर्षापेक्षा अधिक वय नसावे. परीक्षेचे स्वरुप आणि वेळ 3 जून 2023 – सकाळी 9.30 ते 11 या वेळेत 200 गुणांचा गणित विषयाचा पेपर दुपारी 12 ते 1 या वेळेत 75 गुणांचा सामान्य ज्ञान, दुपारी 2.30 ते 4.30 या वेळेत 125 गुणांचा इंग्रजी विषयाचा पेपर लेखी परीक्षेतून मौखिक परीक्षेस पात्र होणाऱ्या विद्यार्थ्यांना मौखिक परीक्षा दिनांक यथावकाश कळविण्यात येणार आहे.