Germany – जर्मनीमध्ये एक इमारत कोसळली आणि ढिगाऱ्याखाली तिघेजण गाडले गेले आहेत. जर्मनीच्या पूर्वेकडील भागातत पोलंडच्या सीमेजवळ असलेल्या गोर्लित्झ शहरात ही दुर्घटना घडली. सोमवारी रात्री या इमारतीमध्ये गॅस सिलिंडरचा स्फोट झाला होता. त्यामुळेच ही इमारत कोसळली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. गॅस गळतीचा धोका असल्यामुळे मदत आणि बचाव पथकांनी सावधगिरी बाळगून मदतकार्य सुरू केले आहे. श्वानपथकाच्या मदतीने बेपत्ता झालेल्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला. (Germany) मात्र त्यात अपयश आल्यावर अवजड यंत्रांच्या मदतीने इमारतीचा ढिगारा आज पहाटेपासून उपसायला सुरुवात झाली. या ढिगाऱ्याखाली किमान पाचजण गाडले गेले असावेत, असा प्राथमिक अंदाज होता. ऐतिहासिक वास्तू असलेल्या विलहेलमायनियान या इमारतीमध्ये अनेक अपार्टमेंट भाड्याने दिल्या गेल्या आहेत. ऐतिहासिक इमारती असलेल्या गेर्लित्झ शहरात अनेक आंतरराष्ट्रीय चित्रपटांची निर्मिती होत असते.