पुणे : भारतातील आघाडीच्या आणि नावीन्यपूर्ण रिअल इस्टेट डेव्हलपर्सपैकी एक असलेल्या गेरा डेव्हलपमेंट्स प्रायव्हेट लिमिटेड (GDPL) ने त्यांच्या नव्या WellnessCentric Homes पोर्टफोलियोतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प Gera’s Avive Towers चे अनावरण केले. या प्रकल्पाच्या माध्यमातून GDPL ने देशात प्रथमच ‘वर्तनकेंद्रित (Behaviour-led) निवासी वेलनेस’ श्रेणी सादर केली आहे. या क्रांतिकारक संकल्पनेत रहिवाशांसाठी डिझाइन, सुविधा, तज्ज्ञ मार्गदर्शन आणि समुदायाचे साहाय्य या चार स्तंभांवर आधारित एक संपूर्ण वेलनेस इकोसिस्टम तयार करण्यात आली आहे. वेलनेस क्षेत्रातील दिग्गजांची साथ – Gera’s Avive Towers मध्ये वेलनेसला दैनंदिन जीवनाचा सहज भाग बनवण्यासाठी भारतातील अग्रगण्य वेलनेस तज्ञांना एकत्र आणले आहे. यात यास्मिन कराचीवाला (पिलाटीस), निशा मिलेट (अक्वा एन्ड्युरन्स एरोबिक्स), आनंदा (प्राणायोगा आणि पर्सनल ट्रेनिंगसह ब्रँडेड जिम) आणि निकोल केडिया (पोषण तज्ज्ञ) यांचा समावेश आहे. या तज्ञांच्या मार्गदर्शनामुळे रहिवाशांना सातत्यपूर्ण आरोग्यदायी दिनचर्या पाळणे सोपे होणार आहे. ‘3-स्तरीय सवय इन्फ्रास्ट्रक्चर’ (3-Tier Habit Infrastructure) पूर्व खराडी येथील 6.91 एकर विस्तीर्ण जागेवर विकसित होणाऱ्या या प्रकल्पात GDPL च्या मालकीच्या 3-स्तरीय सवय इन्फ्रास्ट्रक्चर (Nudge, Support, Sustain) मॉडेलचा वापर केला आहे. गेरा डेव्हलपमेंट्सचे व्यवस्थापकीय संचालक रोहित गेरा लॉन्चवेळी म्हणाले, “शहरी जीवनातील वेळेअभावी आरोग्यदायी दिनक्रम राखणे कठीण होते. WellnessCentric Homes हे असे वातावरण निर्माण करते, जिथे कोणत्याही अडथळ्यांशिवाय आरोग्य सवयी पाळल्या जातात. Gera’s Avive Towers मध्ये डिझाइन, तज्ञ मार्गदर्शन आणि समुदाय यांच्या एकत्रित शक्तीमुळे वेलनेस सहज आणि नैसर्गिक बनतो.” सुविधा आणि डिझाइनमध्ये वेलनेस – Gera’s Avive Towers च्या आर्किटेक्चरमध्ये झेन पॉड्स, माइंडफुलनेस झोन्स, ग्रीन टेरेसेस, बायोफिलिक घटक तसेच नैसर्गिक प्रकाश आणि वायुविजन वाढवणाऱ्या मोठ्या खिडक्या आणि हवेशीर आराखड्याचा समावेश आहे. वेलनेस-केंद्रित सुविधांमध्ये ब्रँडेड जिम, पिलाटीस स्टुडिओ, अक्वा एन्ड्युरन्स एरोबिक्स पूल, योगा स्टुडिओ, न्यूट्रिशन कॅफे, पिकलबॉल आणि बॅडमिंटन कोर्ट्स आणि पूर्ण स्पा यांचा समावेश आहे. ऑलिम्पियन निशा मिलेट यांनी अक्वा एन्ड्युरन्स एरोबिक्सला निवासी समुदायात समाविष्ट करण्याच्या या ‘दूरदर्शी निर्णयाचे’ कौतुक केले आहे. घरांसाठी EOI खुले – Gera’s Avive Towers मधील 3, 3.5 आणि 4 BHK घरांसाठी Expression of Interest (EOI) आता खुले आहेत. या घरांमध्ये प्रायव्हेट प्लंज पूल किंवा सनडेक्सचा पर्याय उपलब्ध असून, त्यांची किंमत रु. 1.26 कोटीपासून सुरू होते. गेरा डेव्हलपमेंट्स : 50 वर्षांचा विश्वास आणि नावीन्य – पुण्यातील रिअल इस्टेटमधील अग्रणी असलेल्या गेरा डेव्हलपमेंट्सने 50 वर्षांहून अधिक काळ पुणे, गोवा, बेंगळुरू आणि कॅलिफोर्निया USA येथे प्रीमियम प्रकल्प यशस्वीपणे विकसित केले आहेत. ‘Let’s Outdo’ या विचारधारेवर चालणाऱ्या गेराने रिअल इस्टेटसाठी 7 वर्षांची वॉरंटी (भारतात प्रथमच), ChildCentric Homes आणि Gera’s Home Equity Power यांसारखे अनेक क्रांतिकारी उपक्रम राबवले आहेत. कंपनीने सलग सात वर्षे Great Place to Work (GPTW) इन्स्टिट्यूटच्या India’s Top 50 Great Mid-Size WorkplacesTM 2024 यादीत आपले स्थान कायम राखले आहे.