“हे बुद्धिबळ खेळण्यासारखे, आम्ही त्यांना…” ; ‘ऑपरेशन सिंदूर’ची योजना कशी आखली?, लष्करप्रमुखांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

General Upendra Dwivedi। लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी पहिल्यांदाच ऑपरेशन सिंदूरच्या नियोजन आणि अंमलबजावणीबद्दल सार्वजनिकरित्या भाष्य केले. आयआयटी मद्रास याठिकाणी भारतीय लष्कराच्या संशोधन कक्षाच्या अग्निशोधच्या उद्घाटनादरम्यान त्यांनी,”ऑपरेशन सिंदूरची रणनीती बुद्धिबळ खेळण्यासारखी होती” असे त्यांनी म्हटले.
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की,”ऑपरेशन सिंदूर ग्रे झोनमध्ये झाले, जे अनपेक्षित होते आणि पारंपारिक लष्करी चकमकीपेक्षा थोडे कमी होते.” ऑपरेशन सिंदूरमध्ये आम्ही जे केले ते बुद्धिबळ खेळणे होते. याचा अर्थ असा की आम्हाला माहित नव्हते की शत्रू कोणती हालचाल करणार आहे आणि आम्ही काय करणार आहोत. ते एक ग्रे झोन होते.”असेही त्यांनी म्हटले. त्यांनी पुढे सांगितले की, “ग्रे झोन म्हणजे आम्ही पारंपारिक ऑपरेशन करत नाही आहोत, परंतु आम्ही असे काहीतरी करत आहोत जे पारंपारिक ऑपरेशनपेक्षा थोडे कमी आहे”
संरक्षणमंत्र्यांनी लष्कराला काय सांगितले? General Upendra Dwivedi।
जनरल द्विवेदी म्हणाले की, “त्याचे नियोजन २३ एप्रिल रोजी सुरू झाले, जेव्हा तिन्ही सैन्य प्रमुख आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी निर्णायक कारवाई आवश्यक आहे यावर सहमती दर्शविली.” ते म्हणाले की, हीच ती वेळ होती जेव्हा संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनीही म्हटले होते की, मला वाटते की आता पुरे झाले आणि तिन्ही लष्कर प्रमुखांची भूमिका अगदी स्पष्ट होती की काहीतरी करायला हवे. निश्चितच, काय करायचे हे ठरवण्याचे पूर्ण स्वातंत्र्य सैन्याला देण्यात आले होते.
ऑपरेशन सिंदूर उरी आणि बालाकोटपेक्षा वेगळे कसे होते? General Upendra Dwivedi।
लष्कर प्रमुख म्हणाले की, “२५ एप्रिलपर्यंत, नॉर्दर्न कमांडने ९ नियोजित लक्ष्यांपैकी ७ महत्त्वाच्या ठिकाणी हल्ला करण्याची तयारी केली होती आणि अनेक दहशतवाद्यांना ठार मारले होते”. ते म्हणाले की, “ऑपरेशन सिंदूर उरी आणि बालाकोटसारख्या पूर्वीच्या ऑपरेशनपेक्षा वेगळे होते.” त्यांनी सांगितले की, “२९ एप्रिल रोजी आम्ही पहिल्यांदाच पंतप्रधानांना भेटलो. ऑपसिंदूर हे छोटेसे नाव संपूर्ण देशाला कसे जोडते हे महत्त्वाचे आहे. हीच गोष्ट संपूर्ण देशाला प्रेरणा देते. हेच कारण आहे की संपूर्ण देश म्हणत होता की तुम्ही का थांबलात? हा प्रश्न विचारला जात होता आणि त्याचे चांगले उत्तर देण्यात आले. ते पुढे म्हणाले की, जर तुम्ही कोणत्याही पाकिस्तानीला विचारले की तुम्ही जिंकलात की हरलात, तर तो म्हणेल की माझे लष्करप्रमुख फील्ड मार्शल झाले आहेत. आम्ही जिंकलेच पाहिजेत, म्हणूनच ते फील्ड मार्शल झाले आहेत.
त्यांनी पुढे सांगितले की ,”उरी ऑपरेशन दरम्यान, स्पष्ट संदेश देण्यासाठी लाँच पॅडना लक्ष्य करण्यावर लक्ष केंद्रित केले गेले होते. २०१९ मध्ये बालाकोट हल्ल्यांचा उद्देश पाकिस्तानमधील प्रशिक्षण शिबिरांना लक्ष्य करणे होता, त्याचा बदला म्हणून. ऑपरेशन सिंदूर व्यापक आणि तीव्र असले तरी, शत्रूच्या हद्दीत आणखी खोलवर हल्ला करण्यात आला. नर्सरी आणि मास्टर्स या सांकेतिक नावाच्या महत्त्वाच्या तळांना लक्ष्य करण्यात आले.”





