-->

जीडी आर्टची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरु

 

मुंबई, दि. 4 : कला संचालनालयामार्फत शैक्षणिक वर्ष 2020-21 करिता जी.डी.आर्ट पदविका अभ्यासक्रमांची प्रथम वर्षाची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.

या अभ्यासक्रमांमध्ये रेखा व रंगकला 4 वर्ष, उपयोजित कला 4 वर्ष, शिल्पकला व प्रतिमानबंध 4 वर्ष, अंतर्गत गृहसजावट 2 वर्ष, वस्त्रकाम (टेक्‍सटाईल) (प्रिंटीग अँड विविंग) 2 वर्ष, मातकाम (सिरॅमिक व पॉटरी) 2 वर्ष, आणि कला शिक्षणशास्त्र पदविका डिप.ए.एड 1 वर्ष या अभ्यासक्रमांची प्रथम वर्षांची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन होईल.

विद्यार्थ्यांनी दि. 10 नोव्हेंबरपर्यंत http://cetcell.net/doa/ या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करणे आवश्‍यक आहे. विद्यार्थ्यांची तात्पुरती निवड यादी तसेच प्रवेश संबंधीच्या पुढील नियोजित तारखा http://cetcell.net/doa/ तसेच www.doa.org.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात येईल, अशी माहिती कला संचालक यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.