Gautami Patil : गौतमी पाटील हिच्या राजकारणात प्रवेशाच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला आहे. लोकप्रियतेच्या जोरावर राजकारणात येणार का? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर गौतमीने एका वाक्यात स्पष्ट उत्तर दिलं आहे. (Gautami Patil) कुर्ला येथे आयोजित करण्यात आलेल्या कुर्ला फेस्टिव्हलमध्ये गौतमी पाटीलच्या नृत्य कार्यक्रमाला प्रेक्षकांची तुफान गर्दी झाली होती. कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना तिला राजकारणात येण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गौतमी म्हणाली, मला राजकारणात यायचं नाही, मला फक्त डान्स करायचा आहे आणि लोकांचं मनोरंजन करायचं आहे. (Gautami Patil) महिलांच्या सुरक्षेवरही व्यक्त केली भूमिका यावेळी गौतमी पाटीलने महिलांवरील अत्याचारांच्या घटनांवरही तीव्र प्रतिक्रिया दिली. राज्यात महिलांवरील अत्याचार वाढत आहेत. अशा नराधमांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. कठोर कारवाई होणं गरजेचं आहे. मी स्वतः महिला आहे, त्यामुळे या गोष्टींचा खूप त्रास होतो, असं ती म्हणाली. (Gautami Patil) अजितदादांनी मला खूप मदत केली संवादादरम्यान गौतमीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबद्दलही भावना व्यक्त केल्या. अजितदादांनी मला खूप मदत केली. आमची प्रत्यक्ष भेट झाली नसली तरी त्यांनी मला नेहमी साथ दिली. त्यामुळे त्यांची मला खूप आठवण येते, असं गौतमीने सांगितलं. (Gautami Patil) महाराष्ट्रभर गौतमीची क्रेझ गौतमी पाटील ही सध्या महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेल्या नृत्यांगनांपैकी एक मानली जाते. तिच्या कार्यक्रमांना राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. सोशल मीडियावरही तिचे व्हिडीओ आणि फोटो मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असतात. (Gautami Patil) मराठी, हिंदी डीजे आणि ट्रेंडिंग गाण्यांवरच्या तिच्या नृत्यामुळे तरुणांमध्ये तिची मोठी लोकप्रियता असून, तिची एक झलक पाहण्यासाठी चाहते कायम उत्सुक असतात. (Gautami Patil)