-->

12 वर्षांनी लहान झैदसोबत विवाहबंधनात अडकण्याबाबत गौहर खान म्हणते…

अभिनेत्री गौहर खान आणि कोरिओग्राफर झैद दरबार लवकरच विविहबंधात अडकणार आहेत ( gauhar khan zaid darbar age ) . हे सेलिब्रिटी कपल त्यांच्यातील वयाच्या अंतरामुळे चर्चेत आहे. मात्र अभिनेत्री गौहर खानने वयाच्या अंतराचा झैद बरोबरच्या आपल्या नात्यावर कोणताही फरक पडणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.

छोटा पडदा गाजवणारी गौहर खान ( gauhar khan ) बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती असून, झैद कोरिओग्राफर आहे. तर झैद ( zaid darbar ) गायक, संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे. दोघेही सोशल मीडियावर आपल्या नात्यासंबधी चाहत्यांना माहिती देत असतात. चाहतेही या सुंदर जोडीच्या नवनवीन पोस्टसच्या प्रतीक्षेत असतात.

अनेकांनी त्यांच्या वयातील अंतराकडे बोट दाखवत कमेंटस केल्या आहेत. अनेकांनी गौहर झैदपेक्षा 12 वर्षांनी मोठी असल्याचे म्हटले आहे. यावर गौहरने आपल्या आणि झैदच्या वयात इतके अंतर नसल्याचा खुलासा केला आहे.

गौहर खान म्हणाली, आमच्या दोघांच्या वयातील अंतराचा जो आकडा ( gauhar khan zaid darbar age difference ) बाहेर सांगितला जात आहे, तो चुकीचा आहे. तो माझ्यापेक्षा लहान आहे, पण 12 वर्षांनी नाही; मात्र वयाच्या मानाने तो खूपच प्रगल्भ आहे. त्यामुळे आमचे नाते खूप मजबूत असल्याचे तिने सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.