सलग सहाव्या दिवशी पेट्रोल महागले

नवी दिल्ली – लॉकडाउन शिथिल होत असताना दुसरीकडे सलग सहाव्या दिवशी इंधर दरात वाढ झाल्याने सर्वसामान्य नागरिकांना याची झळ बसत आहे. देशभरातील वेगवेगळ्या शहरांमध्ये मंगळवारी 9 ते 10 पैसे प्रति लीटरने दर वाढवले आहेत. ही दरवाढ मंगळवारी सकाळी सहा वाजल्यापासून लागू झाली असल्याचे इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने म्हटले आहे.

राजधानी दिल्लीमध्ये आज पेट्रोल 11 पैशांनी महाग झाले आहे. या दरवाढीनंतर दिल्लीमधील पेट्रोलचे दर 81.73 रुपये, तर मुंबईत हाच दर 88.39 रुपये प्रति लीटरपर्यंत वाढला आहे. डिझेलच्या दरामध्ये कोणतीही वाढ करण्यात आलेली नाही.

मागील नऊ दिवसांमध्ये पेट्रोलच्या दरात 1 रुपया 30 पैशांनी वाढ झाली आहे. रोज सकाळी 6 वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतींमध्ये बदल होतो. सहा वाजल्यापासून नवीन दर लागू होतात.

दरम्यान, परदेशी चलनाच्या दराबरोबरच अंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कच्च्या तेलाच्या किंमतींवर रोज पेट्रोल आणि डिझेलचे दर ठरवले जातात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरांवर उत्पादन शुल्क, डीलरचा नफा आणि इतर रक्कम जोडली जाते आणि त्यामुळे इंधनाचे दर जवळजवळ दुप्पट होतात.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.