जामखेड : श्रीगोंदा महामार्गावरील पाटोदा येथे गॅसचा ट्रक झाला पलटी
Updated On:

जामखेड: श्रीगोंदा महामार्गावरील पाटोदा गरडाचे येथे काल दि. २९ मे रोजी रात्री घरगुती गॅस सिलिंडर घेऊन जाणारा ट्रक पलटी झाल्याची घटना घडली आहे. रात्री दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या ट्रकमध्ये १०० पेक्षा अधिक सिलेंडर ठेवलेले होते. ट्रक पलटल्यानंतर सिंलेडर फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. मात्र, पोलीस आणि गावकऱ्यांनी तातडीने मतदकार्य सुरू करून सिंलेंडर दुसऱ्या गाडीत भरण्यात आले.





