Gas Cylinder Price Hike: इराण-इस्रायलमधील युद्धाचा फटका भारताला; घरगुती गॅस सिलिंडर महागला
Gas Cylinder Price Hike : मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गॅस कंपन्यांनी ही दरवाढ झाल्याचे म्हंटले जात आहे.

Gas Cylinder Price Hike: इराण आणि इस्रायलमधील वाढत्या तणावाचा थेट परिणाम आता भारतावरही होऊ लागला आहे. आज ७ मार्च, शनिवारपासून घरगुती आणि व्यावसायिक एलपीजी (LPG) सिलिंडरच्या किमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे.
१४.२ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात ६० रुपयांची, तर १९ किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ११५ रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. मागच्या कित्येक महिन्यांपासून घरगुती गॅस सिलिंडरचे दर स्थिर होते. काल रात्री उशिरा अचानक ही दरवाढ करण्यात आली आहे.
मध्यपूर्वेतील तणावामुळे जागतिक स्तरावर कच्च्या तेलाचे भाव वधारले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून गॅस कंपन्यांनी ही दरवाढ झाल्याचे म्हंटले जात आहे. मुंबई, पुणे, दिल्ली, कोलकाता, चेन्नईसह देशभरात नवे दर आजपासून लागू झाले आहेत.
हॉटेल, रेस्टॉरंट्स आणि लहान व्यावसायिक आस्थापनांसारख्या व्यवसायांवर गॅस दरवाढीचा परिणाम झाला आहे. इराण-इस्त्राइल युद्धामुळे भारतामधील ऊर्जा पुरवठा आणि इंधनाच्या पुरवठ्यावर देशात चर्चा सुरू असतानाच दरवाढीची घोषणा करण्यात आली आहे.
नवे दर काय ? Gas Cylinder Price Hike
दिल्लीत आता ९१३ रुपये मोजावे लागतील. मुंबई आणि चेन्नईत ही किंमत ९२५ रुपयांच्या पार गेली आहे. कोलकात्यात तर ९३९ रुपयांचा आकडा गाठला आहे. फक्त घरगुतीच नाही, तर कमर्शियल सिलिंडरही ११५ रुपयांनी महागल्याने बाहेरचं जेवणही आता महागणार आहे.
दिल्लीपासून मुंबईपर्यंत व्यावसायिक सिलिंडरचे दर ११५ रूपयांने वाढ झाली आहे. राजधानी दिल्लीमध्ये १९ किलो वजनाच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७६८.५० रुपयांवरून १८८३ रुपये झाली आहे.
मुंबईत व्यावसायिक सिलिंडरची किंमत १७२०.५० रुपयांवरून १८३५ रुपये झाली आहे. कोलकातामध्ये सिलिंडरची किंमत १८७५.५० रुपयांवरून १९९० रुपये झाली आहे. तर चेन्नईमध्ये ती १९२९ रुपयांवरून २०४३.५० रुपये इतकी झाली आहे.
दरम्यान, हॉटेल चालक आता जेवणाच्या थाळीचे दर वाढवण्याची शक्यता आहे, ज्यामुळे बाहेर खाणं देखील सामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहे.
हेही वाचा:






