मुंबईत गॅस सिलेंडरचा स्फोट; आईसह दोन मुलांचा मृत्यू
Updated On:

नवी मुंबई – नवी मुंबईतील उलवे येथील जावळे गावात गॅस सिलेंडरचा स्फोट होऊन एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू झाला आहे. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये आईसह दोन मुलांचा समावेश आहे. त्यात, एक 15 वर्षांची मुलगी असून एक 8 वर्षांचा मुलगा आहे. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्नीशमन दलाला यश आले आहे. मात्र दुर्घटनेत तिघांनी आपला जीव गमावला. सर्वत्र दिवाळीचा आनंदोत्सव साजरा करताना घडलेल्या या दुर्घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, घरातील 5 किलोच्या दोन सिलेंडरचा स्फोट झाल्याने ही दुर्दैवी घटना घडली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी पोहोचली, आग आटोक्यात आणण्यात आली. कुटुंबातील 1 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.





