अवकाशातील कचरा ठरणार पृथ्वीसाठी मोठा धोका? शास्त्रज्ञांचा इशारा….

नवी दिल्ली – अवकाशात उपग्रहांचा कचरा सातत्याने वाढत आहे, त्यामुळे शास्त्रज्ञांची चिंता वाढली आहे. उपग्रहांचा वाढता कचरा पृथ्वीसाठी धोकादायक ठरू शकतो, असा इशारा

शास्त्रज्ञांनी दिला आहे. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, सध्या अवकाशात 17 दशलक्षाहून अधिक तुकडे आहेत, ज्यात नैसर्गिक उल्का, कृत्रिम वस्तूंचे तुटलेले तुकडे आणि निष्क्रिय उपग्रह यांचा समावेश आहे.

अमेरिकेतील उटाह विद्यापीठातील संशोधकांचे म्हणणे आहे की, ही जागा खूप कचऱ्याने भरली आहे, त्यामुळे पृथ्वीभोवती शनि सारखी वलये तयार करावी लागतील.

या रिंग्ज बनवण्यासाठी मॅग्नेट तंत्रज्ञानाचा वापर केला जाणार आहे. तसे न केल्यास अवकाशातील वाढत्या कचऱ्यामुळे अवकाशयान आणि उपग्रहाची टक्कर होऊ शकते.

अवकाशातील कचरा किती धोकादायक ?
पृथ्वीवरील प्रदूषणाप्रमाणेच अवकाशातील कचराही धोकादायक आहे ज्यामुळे अंतराळवीर आणि अंतराळ मोहिमांसाठी मोठी समस्या निर्माण होऊ शकते. एका आकडेवारीनुसार, गेल्या 10 वर्षांत अंतराळात 7,500 मेट्रिक टन कचऱ्याची वाढ झाली आहे. अवकाशातील उपग्रहांच्या सुरक्षेसाठी हे अत्यंत धोकादायक आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.