पुणे -“पुणे अर्बन स्ट्रीट’अंतर्गत महापालिकेने नागरिकांना बसण्यासाठी तयार करण्यात आलेल्या जागा चक्क कचरा पेटी म्हणून वापरल्या जात आहेत. सिंगड रस्त्यावर दगडांचा वापर करून सुशोभीकरण करण्यात आले आहे. पण, तेथे कचरा टाकला जात आहे. महापालिकेकडून शहरात पादचाऱ्यांना प्राधान्य देण्यासाठी “अर्बन स्ट्रीट गाइडलाइन्स’अंतर्गत पदपथ विकसित केले जात आहे. यात पदपथावर नागरिकांना सायकल ट्रॅक, चालण्यासाठी तसेच बसण्यासाठी स्वतंत्र जागा तसेच वृक्षारोपणासाठी जागा ठेऊन छोटी उद्याने विकसित केली जात आहेत. जंगली महाराज रस्ता, फर्गसन रस्ता, महापालिका भवनासमोरील रस्ता, स्वारगेट परिसरातील काही रस्त्यावर अशा प्रकारचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. त्यानंतर आता हे काम सिंहगड रस्त्यावर पर्वती जलकेंद्रापासून पु.ल. देशपांडे उद्यान आणि पुढे महावितरणच्या कार्यालयापर्यंत करण्यात येत आहे. त्यात पानमळा चौकाच्या पुढेच महापालिकेने पदपथ मोठे केले आहेत. त्यावर नागारिकांना बसण्यासाठी दगडी ओटे तयार केले आहेत. मात्र, ओट्यांवर भाजी व्यावसायिकांनी त्यांच्यावर अतिक्रमण केले आहे. भाजी विक्री केल्यानंतर कचरा याच दगडी ओट्यांमध्ये टकला जात आहे. त्यामुळे या जागा कचराट्या असल्याचे समजून नागरिकही त्यात कचरा टाकत आहेत. ही ा लक्षात घेऊन महापालिकेने तातडीने हे प्रकार थांबवावेत अशी मागणी केली जात आहे. आमच्या कररुपाने भरलेल्या पैशांतून महापालिका हे सुशोभीकरण करते. मात्र, दुसऱ्या बाजूला लक्ष न दिल्याने चांगल्या सुविधांचाही कचरा होतो. अशीच अवस्था सिंहगड रस्त्यावरील सुशोभीकरणाची झाली आहे. महापालिकेने तातडीन याबाबत कार्यवाही करावी. – अविनाश खंडारे, स्थानिक नागरिक, सिंहगड रस्ता