आबासाहेब गरवारे महाविद्यालय,कर्वे रोड, पुणे
पुणे: पुण्यातील मानाची मानली जाणारी आंतरमहाविद्यालयीन विविध गुणदर्शन स्पर्धा म्हणजेच फिरोदिया करंडक अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. डिसेंबर महिना उजाडला की, पुण्यातील महाविद्यालयीन तरुणाईला फिरोदिया करंडकचे वेध लागायला सुरु होते. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात देखील या स्पर्धेची जोरात तयारी सुरु आहे. अंधार,अपूर्ण अशा नावाजलेल्या प्रयोगानंतर आता आबासाहेब गरवारे महाविद्यालय कोणता नवीन विषय फिरोदिया करंडकातून लोकांसमोर मांडणार? ह्याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.