मुंबईत गिरगाव चौपाटीवर गणपती विसर्जनाची जय्यत तयारी ; महापालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मिती
Updated On:

Ganpati Visarjan 2025। अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या गणरायाचे आज विसर्जन होणार आहे. अनंत चतुदर्शीला मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि अन्य परिसरात हजारो सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणपतींचे विसर्जन होणार आहे.
दरम्यान, गिरगाव चौपाटीवर विसर्जनाची तयारी पूर्ण झाली आहे. घरगुती गणपतींच्या विसर्जनासाठी मुंबई महापालिकेकडून कृत्रिम तलावांची निर्मिती चौपाटीवर करण्यात आली आहे. सोबतच, मुंबई पोलिसांची देखील मोठी कुमक तैनात असणार आहे.
परदेशी पाहुणे आणि व्हीव्हीआयपींना राज्य गणेशोत्सव बघता यावा यासाठी महापालिका आणि राज्य सरकारकडून मंडपांची उभारणी केली गेली आहे. सोबतच, लहान घरगुती गणपती देखील यायला सुरुवात झाली आहे.





