पिंपरी – स्वत:च्या हाताने गणरायाची मूर्ती बनवता येऊ शकते. याबाबत विद्यार्थ्यांच्या मनामध्ये असलेली उत्सुकता आज दैनिक प्रभातच्या “प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या उपक्रमामुळे पूर्ण झाली. या उपक्रमामध्ये भोसरी, इंद्रायणीनगर येथील प्रियदर्शनी स्कूलमधील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवून उत्साही वातावरण आकर्षक आणि सुंदर गणेशमूर्तींना आकार दिले. आपल्या हाताने बनवलेली मूर्ती पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा आनंद गगनात मावनेसा झाल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. दैनिक प्रभातच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या प्रभात ग्रीन गणेशा-2019′ या कार्यशाळा उपक्रमाच्या आज पाचव्या दिवशी भोसरी येथील इंद्रायणी नगरमधील प्रियदर्शनी स्कूलमध्ये पार पडली. आजच्या कार्यशाळेत इयत्ता आठवी, नववी व दहावीचे 100 विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. या कार्यशाळेमध्ये विद्यार्थ्यांना सहज आणि सोप्या पद्धतीने शाडू मातीपासून गणेशाची मूर्ती कशी साकारायची, याचे प्रशिक्षण व प्रात्यक्षिक नितीन ठाकरे आणि त्यांचे सहकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना करून दाखविले. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांनी अगदी सोप्या पद्धतीने शाडूच्या मातीमधून गणेशाच्या सुंदर आणि आकर्षक मूर्ती साकारल्या. या उपक्रमामध्ये सहभागी झाल्याबद्दल प्रियदर्शनी शाळेचे संस्थापक अध्यक्ष इंद्रमन सिंग यांना मानपत्र देऊन गौरवण्यात आले. यावेळी, शाळेच्या राजेंद्र सिंग, नरेंद्र सिंग, तरुणा सिंग, मुख्याध्यापिका अर्पिता दीक्षित, डॉ. गायत्री जाधव, सतीश क्षीरसागर, प्रिया भोकरे, ललिता ठाकूर, शिवाजी आढळगे, स्वप्नजा माळी, उमेश कोळेकर, चैताली नाफडे, प्रतिमा परदेशी, प्रतिभा सिंग आदींची उपस्थिती होती.