कुख्यात आक्या बॉन्ड टोळीतील गुंडास पिस्तुलासह अटक !

पिंपरी : कुख्यात आक्या बॉन्ड टोळीतील गुंडास पिस्तुलासह चिखली पोलिसांनी अटक केली. ही घटना ही घटना गुरुवारी (दि. 9) शरदनगर, चिखली येथे घडली.
विकास ऊर्फ पांग्या धोंडीराम जाधव (वय 22, रा. जिजामाता हौसिंग सोसायटी, शरदनगर, चिखली) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी जाधव याच्यावर खूनी हल्ल्याचे दोन, दरोडा, जबरी चोरी, गंभीर दुखापत करणे, प्राणघातक हत्यार बाळगणे या कलमांखाली तब्बल सात गुन्ह्यांची नोंद आहे. अनेक गुन्ह्यांमध्ये तो फरार आहे.
आरोपी विकास जाधव हा गुरूवारी घरकुल लगत असलेल्या पीरबाबा दर्ग्याजवळ येणार असल्याची माहिती पोलीस नाईक विश्वास नाणेकर आणि पोलीस कर्मचारी संतोष सकपाळ यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून आरोपी विकास जाधव याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता त्यांच्यावर एक पिस्तुल व दोन जीवंत काडतूसे मिळून आली.





