धक्कादायक! कुटुंबियांना दोरीने बांधून तीन महिलांवर सामूहिक बलात्कार

चंदीगड – हरियाणातील (Haryana) पानिपत येथे तीन महिलांवर चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या कुटुंबियांसमोर बलात्कार केल्याचा आरोप आहे. पोलिसांनी सांगितले की, बुधवारी रात्री उशिरा ही घटना घडली असून त्यात आरोपी चाकू आणि इतर धारदार शस्त्रे घेऊन पिडीतांच्या घरात घुसले.
चार जणांनी जबरदस्तीने घरात घुसून कुटुंबातील सदस्यांना दोरीने बांधून तीन महिलांवर बलात्कार केला. आरोपींनी पैसे आणि दागिनेही लुटल्याचे पोलिसांनी सांगितले.
बुधवारी रात्रीच एका महिलेवर हल्ला करून तिच्या पतीला लुटण्यात आले होते. सामूहिक बलात्काराच्या (Gang-rape) घटनास्थळापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर ही घटना घडली होती.
या घटनेमध्ये संबंधित महिलेचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी बळजबरीने दाम्पत्याच्या घरात घुसून मारहाण केल्याने दुसऱ्या घटनेत या सामूहिक बलात्कारातही याच लोकांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्यांनी त्या व्यक्तीचे पैसे आणि मोबाईल फोन लुटला. दोन्ही घटना एकाच गावात घडल्या आहेत. याप्रकरणी तपास सुरू असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही.





