पुणे : मार्केटयार्ड परिसरात घरफोडी व दरोडा टाकणाऱ्या सराईत महिला गुन्हेगारांच्या टोळीला मार्केटयार्ड पोलीस ठाण्याच्या तपास पथकाने शिताफीने अटक केली आहे. या महिला बुलढाणा येथे जंगलात लपून बसलेल्या आढळल्या. या प्रकरणी सात नोव्हेंबरला घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. सुनिता पिंटु सोळंकी (२२ वर्षे), मीना रवी सोळंकी (२३ वर्षे), बत्ती गणपत शिंदे (२५ वर्षे), पूजा जगदेव सोळंकी (२० वर्षे), आईना अंकुश सोळंकी (२७ वर्षे), एक विधिसंघर्षित बालिका अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी संजीव माधव कोकणे (६६) यांनी दिलेल्या तक्रारीनूसार त्यांची बहिण कुटूंबासह मार्केटयार्ड येथील प्रेमनगर येथे रहाते. ती पतीसह जून २०२५ पासून अमेरिकेत आपल्या मुलींना भेटण्यासाठी गेली आहे. त्यांना ७ नोव्हेंबरला मेव्हुण्याचा फोन आला की, घराच चोरी झाली आहे, लगेच जाऊन पहा . ते गेले असता शेजारी रहाणाऱ्या व्यक्तींनी सांगितली की, सकाळी काही महिलांना घराच्या गेटवरून उड्या मारून बाहेर जाताना पाहिले. घराची पहाणी केली असता, घराचा कडी-कोयंडा तोडलेला व तळमजला अस्ताव्यस्त दिसून आला. देवघरातील अंदाजे २५ ते ३० हजार रुपये किमतीच्या देवमूर्ती व साहित्य चोरीला गेल्याचे आढळले. तपासाचा धागा बुलढाण्यापर्यंत तक्रारीनंतर तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अक्षयकुमार गडगडे यांना महिला आरोपींबाबत माहिती मिळाली. त्यांना आरोपी ( मोहिदेपुर ता. जळगाव जामोद, जि. बुलढाणा ) येथे असल्याची खात्री पटल्यावर त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील यांच्या आदेशानुसार तपास पथक तेथे रवाना झाले. स्थानिक पोलिसांचे व पोलीस पाटील गोविंदा शिंदे यांचे सहाय्याने शोधमोहीम राबवली असता त्या महिला शेतात आणि जंगलात लपलेल्या अवस्थेत सापडल्या. त्यांना पुढील तपासासाठी पुण्यात आणून अटक करण्यात आली. तपासात त्यांचे अगोदरचे रेकॉर्डची सापडले. ही कारवाई अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील ,उपआयुक्त (परिमंडळ ५ ) राजकुमार शिंदे, सहा. पोलीस आयुक्त नागरता देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनिषा पाटील ,पोलीस निरीक्षक (गुन्हे) सुनिता नवले , तपास पथकाचे प्रभारी अक्षयकुमार गडगडे , उपनिरीक्षक सुनिल भापकर, पोलीस हवालदार राजेश थोरात, महेश जेधे, वनिता माने, धनश्री गोफणे, दत्तात्रय राऊत, कौस्तुभ जाधव, किरण जाधव, अंमलदार यादव, सरतापे यांनी केली