Ganesh Visarjan 2021: निरोप घेतो देवा आम्हा आज्ञा असावी, असे होणार यंदा मानाच्या पाच गणपतींचे विसर्जन

पुणे – प्रथम पूजनीय गणपतीच्या गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला.

आज रविवार 19 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी आहे. त्यामुळे आज अखेर दहा दिवसांच्या गणपतीचे विसर्जन होणार आहे.

दरम्यान, करोनाच्या पार्श्ववभूमीवर पुण्याची वैभवशाली गणपती विसर्जन मिरवणूक यंदाही होणार नाही. मानाच्या गणपती मंडळांनी समाजहितासाठी उत्सव मंडपातच गणरायाचे विसर्जन करायचा निर्णय यंदाही घेतला आहे.

परंपरेनुसार मानाचा पहिला कसबा गणपती चे विसर्जन सकाळी 11 वा होणार असून त्यानंतर 45 मिनिटानंतर क्रमवारीनुसार इतर चार गणपतींचे विसर्जन होणार आहे.

श्री कसबा गणपती 11 वा, तांबडी जोगेश्वरी 11.45, गुरुजी तालीम 12.30 , श्री तुळशीबाग 1.15 मि, केसरी वाडा 2 वा, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती 2.45 मि.

तर श्री तुळशीबाग मंडळाने आकर्षक गजकुंड केलेले असून त्यावर फुलांची सजावट असणार आहे. पारंपरिक धार्मिक पद्धतीने उत्सव मंडपात गणराया चे विसर्जन होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.