गणेश चतुर्थीला बँका राहतील बंद , ही आहे RBI ची यादी; जाणून घ्या

आजपासून गणेश चतुर्थी उत्सवाला सुरुवात होत आहे. देशातील अनेक भागांमध्ये गणेश चतुर्थीचा सण मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो. महाराष्ट्रापासून गुजरातपर्यंत त्याचे महत्त्व आहे. अशा स्थितीत अनेक ठिकाणी बँका बंद राहतात आणि कामकाज होत नाही. आजही अनेक ठिकाणी बँका बंद राहणार आहेत. या महिन्यात कुठल्या तारखेला बँकेला सुट्टी असणार आहे जाणून घेऊया…
रिझर्व्ह बँकेकडून दर महिन्याला बँक सुट्ट्या दिल्या जातात. आरबीआयच्या म्हणण्यानुसार, गणेश चतुर्थीला संपूर्ण भारतात सुट्टी नसेल, परंतु अनेक ठिकाणी बँका बंद राहतील. आरबीआय बँक हॉलिडे कॅलेंडरनुसार, गणेश चतुर्थीच्या दिवशी मुंबई, नागपूर, पणजी, अहमदाबाद, बेलापूर, बेंगळुरू, चेन्नई, भुवनेश्वर, हैदराबाद (आंध्र प्रदेश आणि तेलंगणा) येथे बँका बंद राहतील. त्याच वेळी, देशातील उर्वरित राज्यांमध्ये बँका सामान्यपणे काम करतील.
सप्टेंबरमध्ये बँका कधी बंद राहतील ?
सप्टेंबर महिन्यात भरपूर सुट्ट्या असतात. यावेळी देशातील अनेक भागांत बँका १०-१२ दिवस नव्हे तर १५ दिवस बंद राहतील.
1 सप्टेंबर: रविवार
7 सप्टेंबर: गणेश चतुर्थी
8 सप्टेंबर: रविवार
14 सप्टेंबर: दूसरा शनिवार, फर्स्ट ओणम (कोची, रांची और तिरुवनंतपुरम)
15 सप्टेंबर: रविवार
16 सप्टेंबर: बारावफात
17 सप्टेंबर: मिलाद-उन-नबी (गंगटोक और रायपुर)
18 सप्टेंबर: पंग-लहबसोल (गंगटोक)
20 सप्टेंबर: ईद-ए-मिलाद-उल-नबी (जम्मू और श्रीनगर)
22 सप्टेंबर: रविवार
21 सप्टेंबर: श्री नारायण गुरु समाधि दिवस (कोची और तिरुवनंतपुरम)
23 सप्टेंबर: महाराजा हरिसिंह जी जन्मदिवस (जम्मू और श्रीनगर)
28 सप्टेंबर: चौथा शनिवार
29 सप्टेंबर: रविवार
सुट्ट्या बदलतात
बँकांच्या सुट्ट्यांची यादी सर्व राज्यांमध्ये सारखी नसते. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या म्हणण्यानुसार, सर्व राज्यांसाठी सुट्ट्यांची यादी वेगळी आहे. या सुट्ट्यांची संपूर्ण यादी आरबीआयच्या अधिकृत वेबसाइटवर दिली आहे, ज्यामध्ये राज्यांनुसार विविध सण आणि सुट्ट्यांची संपूर्ण माहिती दिली आहे. बँका बंद असूनही ग्राहकांना कोणतीही अडचण येणार नाही. सुट्टीच्या दिवशीही लोक ऑनलाइन बँकिंगच्या मदतीने आपली सर्व कामे पूर्ण करू शकतात. आजच्या काळात बँकेच्या बहुतांश सेवा ऑनलाईन उपलब्ध आहेत. त्यामुळे सुट्टीच्या दिवशीही तुम्ही घरबसल्या बँकिंगची अनेक कामे पूर्ण करू शकता.



