कोपरगाव | खड्डेमय रस्त्याला वैतागून शाळकरी मुलींची महिला दिनी गांधीगिरी

Updated On:
कोपरगाव | खड्डेमय रस्त्याला वैतागून शाळकरी मुलींची महिला दिनी गांधीगिरी

कोपरगाव (प्रतिनिधी) : रस्ता कमी, खड्डे जास्त अशी दयनीय अवस्था कोपरगाव ते पुणतांबा या रस्त्याची झाल्याने या रस्त्यावरुन प्रवास करणाऱ्यांना अनेक यातना सहन कराव्या लागत आहेत. या खड्डेमय रस्त्याने शाळकरी मुलं दररोज प्रवास करताना दररोज छोटेमोठे अपघात होत असतात. अनेक दिवसांपासून वैतागलेल्या समता इंग्लिश मिडीयम स्कूलच्या शाळकरी मुलींनी अखेर तालुक्यातील कोकमठाण परिसरातील समता स्कूल चौफुलीवर महिला दिनाचे औचित्य साधून पुणतांबा कोपरगाव रस्त्यावर गांधीगिरी करीत रस्त्यातील खड्ड्यांना सडा रांगोळीने सजवून त्या खड्ड्यात वृक्षारोपण करुन स्थानिक प्रशासनाचा निषेध केला. यावेळी या शाळकरी मुलींना पाठींबा देण्यासाठी तेथील ग्रामस्थही रस्त्यावर उतरुन त्यांनीही या अंदोलनात सहभाग घेतला.

एका बाजुला आठ मार्च हा दिवस जागतिक महीला दिन म्हणून साजरा केला जातो. महिलांच्या मान सन्मानाचे गुणगान गायले जात असताना कोपरगाव तालुक्यातील शाळकरी मुलींना आपल्या हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची वेळ येते. हे चिञ अतिशय विरोधाभास दर्शवणारे आहे. या अनोख्या गांधीगिरी बद्दल शाळकरी मुलींनी आपल्या भावना व्यक्त करीत त्वरीत खड्डेमुक्त रस्ते करण्याची मागणी केली.

दरम्यान, रस्त्याच्या कडेला निषेधाचे फलक धरुन रस्त्याने ये-जा करणाऱ्यांचे लक्ष शाळकरी मुलींनी वेधले. या गांधीगिरी आंदोलनाच्यावेळी शाळकरी विद्यार्थीनीसह राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काका कोयटे, समता इंग्लिश मिडीयम स्कूल च्या अध्यक्षा स्वाती कोयटे, स्कूलचे प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षिका व इतर कर्मचारी उपस्थित होते.

संबधीत विभागाचे अधिकारी, स्थानिक प्रशासनाचे सर्व अधिकारी, लोकप्रतिनिधी यांना पुणतांबा कोपरगाव रस्त्याची चाळण झाल्याच्या तक्रारी वारंवार करुनही या जिवघेण्या रस्त्याचे काम करण्यास टाळा टाळ होत असल्याची खंत येथील ग्रामस्थांनी केली.

आणखी संबंधित बातम्या

Newasa: रस्त्यासाठी पटारे कुटुंबाचे तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण

2026-05-19 22:33:06

Newasa: रस्त्यासाठी पटारे कुटुंबाचे तहसील कार्यालयासमोर अमरण उपोषण

Jamkhed News: न्हावरा फाटा ते जामखेड रस्त्यावर सभापतींनकडून झाडाझडती

2026-05-14 12:57:58

Jamkhed News: न्हावरा फाटा ते जामखेड रस्त्यावर सभापतींनकडून झाडाझडती

Shirur News : दोनदा दुरुस्ती करूनदेखील रस्ता उखडला; नागरिकांनी व्यक्त केला तीव्र संताप

2025-12-25 15:52:23

Shirur News : दोनदा दुरुस्ती करूनदेखील रस्ता उखडला; नागरिकांनी व्यक्त केला तीव्र संताप

Nitin Gadkari : महाराष्ट्रासाठी 1.50 लाख कोटींच्या रस्ते कामांस मंजुरी; मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती

2025-12-13 16:59:45

Nitin Gadkari : महाराष्ट्रासाठी 1.50 लाख कोटींच्या रस्ते कामांस मंजुरी; मंत्री नितीन गडकरींनी दिली माहिती

जांबुत येथील रस्त्याची चाळण; अपघाताचा धोका वाढल्याने ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा

2025-12-01 12:42:54

जांबुत येथील रस्त्याची चाळण; अपघाताचा धोका वाढल्याने ग्रामस्थांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा