Nevase News : नेवासे तालुका गणरायाला भावपूर्ण भक्तीमय वातावरणात निरोप!
Nevase News : ज्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केली,आरती केली, मोदकाचा नैवेद्य दाखवला,त्याच च बाप्पाना आज निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झालेले होते.

नेवासे : दहा दिवस आपल्या घरात,आपल्या मनात वसलेला बाप्पा आज विसर्जित होत असतांना प्रत्येकांचा डोळा पाणावलेला होता.”गणपती बाप्पा मोरया,पुढच्या वर्षी लवकर या” च्या गजरात नेवासे तालुक्यातील हजारो भाविकांनी आज आपल्या लाडक्या गणरायाला निरोप दिला.
ठिकठिकाणी भक्तीचा महापूर
नेवासे तालुक्यातील प्रत्येक गावात,वाडी – वस्तीवर ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाच्या विसर्जन मिरवणुका निघालेल्या होत्या यामध्ये लहान चिमुकल्यांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण बाप्पाला निरोप देण्यासाठी नेवासे शहरातील घाटावर तसेच प्रवरासंगम येथे जमलेले होते.
निरोप घेताना डोळे पाणावले
ज्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केली,आरती केली, मोदकाचा नैवेद्य दाखवला,त्याच च बाप्पाना आज निरोप देताना अनेकांना अश्रू अनावर झालेले होते.”बाप्पा, जात असतांना आमची काळजी घे,आमच्यावर तुझी सदैव कृपा राहू दे” अशीच प्रत्येक भाविकांनी यावेळी प्रार्थना करत जड अंतःकरणाने अखेर बाप्पांना निरोप दिला
पर्यावरणपूरक विसर्जनाला प्राधान्य
यावर्षी अनेक मंडळांनी आणि घरगुती गणेशांनी शाडूच्या मूर्तीला प्राधान्य देत पर्यावरणपूरक गणरायाला प्राधान्य देवून विसर्जन केले, हे यंदाच्या वेळी विशेष कौतुकास्पद ठरलेले आहे बाप्पा आज गेलेले असले तरी त्यानी दिलेला आनंद,एकोपा आणि उत्साह मात्र पुढच्या वर्षापर्यंत मनात कायम राहणार असल्याची भावना यावेळी गणेशभक्तांतुन व्यक्त केली जात होती नेवासे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पवार आणि पोलीस अधिकारी – कर्मचारी यांनी गणेश विसर्जन मिरवणूक शांततेत होण्यासाठी विशेष बंदोबस्त ठेवलेला होता.
अहिल्यानगर – छत्रपती संभाजीनगर महामार्गवरील प्रवरासंगम येथील गोदावरी नदीपुलावर दोन जिल्ह्यातील गणेश विसर्जन गेल्या १४ तास सलग सुरूच होते त्यामुळे दोन जिल्ह्यातील पोलीस फौजफाटा प्रवरासंगम गणेश भक्तांच्या बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आलेला होता.





