खेळ ते राजकारण

अलीकडेच भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर याने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. राजकारण्यांनी खेळ वा “क्रीडा’ किंवा “गेम’ करणे ही काही नवीन गोष्ट नाही. त्याचप्रमाणे खेळाडूंनी राजकारणात पडणे हेही आता नवीन राहिले नाही. खूप वर्षापूर्वीपासून खेळाडू राजकारणात प्रवेश करत आहेत. अशाच राजकारणात आपली “इनिंग’ खेळायला आलेल्या क्रीडापटूची नावे पाहू…

टायगर पतौडी : सर्वांत जास्त काळ भारताच्या कर्णधारपदी विराजमान असलेले मन्सूर अली खान ऊर्फ टायगर पतौडी यांनी गुडगांव येथून विशाल हरियाणा पार्टीतर्फे 1971 साली निवडणूक लढवली. त्यानंतर तब्बल दोन दशकांनंतर त्यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली. दोन्ही “इनिंग्ज’मध्ये त्यांना पराभव पत्करावा लागला.

चेतन चौहान : गावस्करांचे ओपनिंग पार्टनर असलेले चेतन चौहान हे 1991 आणि 1998 साली आमरोही येथून भाजपाचे खासदार म्हणून निवडून आले. पण त्यानंतरच्या निवडणुकीत ते पराभूत झाले.

अस्लम शेर खान : भारताचे माजी हॉकीपटू असलेले अस्लम शेर खान दोन वेळा कॉंग्रेसचे खासदार म्हणून निवडून आले. पण 2009 मध्ये त्यांचा पराभव झाला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.