Game Changer OTT Relese : थिएटर्समध्ये फ्लॅाप झालेला गेम चेंजर ‘या’ ओटीटीवर रिलीज होणार; जाणून घ्या कधी पाहता येणार?

१० जानेवारीला अभिनेता राम चरणचा गेम चेंजर हा सिनेमा थिएटर्समध्ये रिलीज झाला. रिलीजच्या पहिल्या दिवशी सिनेमाने चांगली कमाई केली. मात्र, हळूहळू सिनेमाच्या कमाईत घसरण झाली. तब्बल ४५० कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या गेम चेंजर सिनेमाने बॅाक्स अॅाफिसवर केवळ १३० कोटी रुपयांची कमाई केली. थोडक्यात हा सिनेमा बॅाक्स अॅाफिसवर फार काही कमाल दाखवू शकला नाही.
आता गेम चेंजर त्याच्या ओटीटी रिलीजसाठी तयार असून अॅमेझॅान प्राइम या ओटीटीवर तो रिलीज करण्यात येणार आहे. हा सिनेमा ओटीटीवर काही कमाल करतो का हे पाहणे महत्वाचे असणार आहे. गेम चेंजर या सिनेमाचे दिग्दर्शन शंकर यांनी केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गेम चेंजर अॅमेझॅान प्राइमवर ६ फ्रेब्रुवारीला रिलीज होणार असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र, अद्यापर्यंत सिनेमाच्या रिलीज डेटबाबात निर्मात्यांनी या तारखेची पुष्टी केलेली नाही. या सिनेमाने रिजीजच्या पहिल्या दिवशी ५१ कोटी रुपयांची भरगच्च कमाई केली होती. त्यानंतर सिनेमाच्या कलेक्शनमध्ये सातत्याने घट होत गेली. गेम चेंजर हा कार्तिक सुब्बाराज यांनी लिहिलेला एक राजकीय थ्रिलर सिनेमा आहे. या सिनेमात राम चरण, कियारा अडवाणी, अंजली, एसजे सूर्या, श्रीकांत, जयराम आणि नवीन चंद्रा यांच्या मुख्य भूमिका आहेत.





