प्रभात वृत्तसेवा पिंपरी – देहुरोड पोलीस स्टेशन हद्दीत विठ्ठलवाडी मधील इंद्रायणी नदीकाठी मोकळ्या जागेत जुगार खेळणाऱ्या १० जणांना पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई रविवारी (१४ डिसेंबर) सायंकाळी करण्यात आली.पोलीस कॉन्स्टेबल श्यामसुंदर गुट्टे यांनी देहुरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विजय बबन भालेकर (वय ५०, रा. तळवडे), पंढरीनाथ गोपाळ मोरे (वय ६५, रा. देहुगाव), राजु नामदेव बोतरे (वय ६२, रा. येलवाडी), सोपान रामचंद्र शेलार (वय ६४, रा. विठ्ठलवाडी देहुगाव), बाबासाहेब लुमाजी रासकर (वय ५७, रा. विठ्ठलवाडी देहुगाव), चंद्रशेख गुलाब परंडवाल (वय ५४, रा. माळवाडी देहुगाव), बबन आनंदा कोळेकर (वय ५४, रा. विठ्ठलवाडी देहुगाव), दत्तात्रय लक्ष्मण हागवणे (वय ५३, रा. विठ्ठलवाडी देहुगाव), सुभाष चंद्रकांत काळोखे (वय ५७, रा. विठ्ठलवाडी देहुगाव) आणि भरत बबन रौधळ (वय ५३, रा. विठ्ठलवाडी देहुगाव) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तीन पत्ती नावाचा जुगार खेळत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा मारून कारवाई करत दहा जणांना अटक केली त्यांच्याकडून 23 हजार 100 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे देहूरोड पोलीस याबाबतअधिक तपास करीत आहेत.