Pune : गजानन पाटील झेडपीचे सीईओ
Updated On:

पुणे : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी(सीईओ) गजानन पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
तर पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांची सातारा जिल्हाधिकारी या पदावर नियुक्ती झाली आहे.
गजानन पाटील यांनी यापूर्वी खेडचे प्रांताधिकारी म्हणून काम केले आहे. त्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यालयात उपसचिव म्हणून कार्यरत होते.
त्यांची अप्पर जिल्हाधिकारी म्हणून पदोन्नती झाली. त्यानंतर आता ते पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे स्वीकारणार आहेत.




