मोठी बातमी : थरारक पाठलागानंतर गुंड गजानन मारणे मेढा पोलीसांना शरण

पाचगणी (प्रतिनिधी) – कुडाळमार्गे येणाऱ्या भरधाव क्रेट गाडीचा मेढा पोलीसांनी थरारक पाठलाग करत मेढ्याच्या बाजार चौकात पुण्यातील कुख्यात गुंड गजा मारणे याच्यासह चौघांना ताब्यात घेतले.

मेढ्याच्या बाजार चौकात पोलिसांनी भरधाव गाडीला पोलीस गाडी आडवी लावल्यावर गाडीमधील लोकांचे सर्च आँपरेशन सुरु केले. गाडीतील एकाने डोक्यावरील टोपी काढून मीच गजानन मारणे आहे, असे सांगितले. पोलीसांनी चौकातच चौघांची ओळखपरेड घेतल्याने काही काळ वातावरण तंग झाले होते.

खंडणीचा गुन्हा दाखल असलेल्या गजानन मारणे याचा राज्याचे गृह खाते शोध घेत होते. मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने व त्यांच्या सहकाऱ्यांनी गजानन मारणे याला पकडण्याकरीता केलेला पाठलाग व सर्च आँपरेशन यामुळे मेढ्यात मात्र वातावरण तंग झाले होते.

चार लोकांपैकी गजानन मारणे कोण याबाबत फोटोतपासणी करताना एकाने ओळख सांगताच पोलिसांनी चाैघांना पोलीस वाहनातून पोलीस ठाण्यात नेले. तिथे चौघांना ताब्यात घेताना एक लाख ५२ हजार रुपये रोख रक्कम व क्रेटा गाडी मेढा पोलीसांच्या ताब्यात घेण्याची कारवाई सुरु होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.