‘थलायवी’ सिनेमासाठी वजन वाढवणं कंगनाला पडलं महागात; आयुष्यभरासाठी निर्माण झाल्या शारीरिक समस्या

मुंबई – आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे कायमच चर्चेत येणारी अभिनेत्री म्हणजे कंगना राणावत. नुकतंच कंगनाचा बहुचर्चित असा ‘थलायवी’ हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे. सर्वांनी चित्रपटासाठी आणि अभिनयासाठी कंगनाचे खूप कौतुक ही केले.

जयललिता यांनी दक्षिण चित्रपट उद्योगात भरपूर नाव कमावल्यानंतर राजकारणात प्रवेश केला होता आणि इथेही त्यांनी यशाचा नवा इतिहास रचला. चित्रपटात कंगना व्यतिरिक्त साऊथ सुपरस्टार अरविंद स्वामी, मधु आणि भाग्यश्री सारखे कलाकार मुख्य भूमिकेत दिसले.

या भूमिकेसाठी कंगनाने चांगलीच कंबर कसली होती. तिची हीच मेहनत या चित्रपटातून दिसून सुद्धा आली आहे. मात्र, या आपल्या भूमिकेला न्याय देण्यासाठी कंगनाने केलेल्या वर्कआऊटमुळे आता तिला शारीरिक समस्यांना सामोरं जावं लागत आहे. हो या संदर्भातील एक पोस्ट सुद्धा तिने सोशल मीडियावर शेअर केली आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Kangana Thalaivii (@kanganaranaut)

काय म्हणाली अभिनेत्री?

“6 महिन्यांत 20 किलो वजन वाढवलं होतं आणि आता या 6 महिन्यात मी सारं काही गमावलं आहे. तेही अगदी वयाच्या 30 व्या वर्षी. मला अनेक शारीरिक व्याधी जडल्या आहेत. मुळात यापूर्वीच मला स्ट्रेसची समस्या होती, पण मला आता कायमस्वरूपी स्ट्रेच मार्क्स देखील आले आहेत..” असं कॅप्शन कंगनाने या फोटोला दिलं आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.