छत्रपती संभाजीराजे यांच्या शौर्याची आणि पराक्रमाची यशोगाथा छावा सिनेमाच्या निमित्ताने मोठ्या पडद्यावर पाहिला मिळणार आहे. या सिनेमात अभिनेता विकी कौशल हा छत्रपती संभाजीराजेंच्या भूमिकेत असून महाराणी येसूबाई यांच्या भूमिकेत अभिनेत्री रश्मिका मंदाना आहे. येत्या १४ फेब्रुवारीला छावा सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्याआधी या सिनेमाचे जोरदार प्रमोशन केले जात आहे. अभिनेता विकी कौशल आणि सिनेमाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी चॅनेल्सला मुलाखली देत सिनेमाचा अनुभव सांगत आहेत. छावाच्या रिलीज डेटला अवघे काही दिवस शिल्लक राहिल्याने प्रेक्षकांमध्ये या सिनेमाची मोठी क्रेझ पाहिला मिळत आहे. अस्सखिलित मराठी बोलणारा विकी एका वाहिन्याला दिलेल्या मुलाखतीमध्ये अभिनेता विकी कौशल आणि छावाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी सिनेमातील अनेक प्रसंग सांगितले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांच्या भूमिकेसाठी विकीने तब्बल ७ ते ८ महिनेने प्रशिक्षण घेत आपल वजन वाढवल असल्याचे उतेकर यांनी सांगितले. या मुलाखती दरम्यान विकी अस्सखलित मराठी बोलत असल्याचे पाहिला मिळाले. …अन् मला वजन वाढवावं लागलं या सिनेमाच्या निमित्ताने अगदी लहान-लहान गोष्टींचा अभ्यास मला करता आला. मी या निमित्ताने खूप गोष्टी वाचल्या. मला सरांनी महाराजांबद्दल पहिलं वाक्य सांगितलं होतं ते म्हणजे, राजेंची तलवार ६० किलोंची होती. ती ६० किलोची तलवार फक्त उचलायची नाहीये तर त्याने लढाई करायची आहे. हे सगळं ऐकून मी थक्क झालो होतो. त्यावेळी मला वजन वाढवावं लागेल याची कल्पना आली असल्याचे विकी कौशलने सांगितले. माझं वजन ८० वरून ते थेट १०५ किलोपर्यंत मी वाढवलं. तलवारबाजी, घोडेस्वारी आदी गोष्टी शिकल्यानंतरच आम्ही शुटिंगला सुरूवात केली असल्याचे विकीने सांगितले. …आता आयुष्यभर लक्षात राहणार छत्रपती संभाजी महाराज ही व्यक्तीरेखा जशाच्या तशा साकारणे हे कोणालाच शक्य नाही. कारण राजे महाने होते. त्यांची भूमिका साकारताना फक्त आपले १०० टक्के देऊ शकतो. मी माझ्या बाजूने पूर्ण प्रयत्न केले. पण या प्रवासात महाराजांबद्दल मी जे काही शिकलो, ते आता मला आयुष्यभर लक्षात राहणार असल्याचे विकीने सांगितले. १४ फेब्रुवारीला छावा रिलीज छावा हा सिनेमा येत्या १४ फेब्रुवारीला देशभरातील सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाबद्दल प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. छावामध्ये छत्रपती संभाजीराजे यांच्या पराक्रमाची यशोगाथा पाहिला मिळणार आहे. सिनेमाचे दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या भूमिकेत विकी कौशल, येसूबाईंच्या भूमिकेत रश्मिका मंदाना आणि औरंजेबच्या भूमिकेत अक्षय खन्ना पाहिला मिळणार आहे.