गडचिरोली : आत्मसमर्पण केलेला माओवादी भूपतीने आपल्या सीपीआय (माओवादी)च्या सहकार्याना सशस्त्र संघर्ष सोडून मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले. आंध्र प्रदेशातील चकमकीत प्रमुख नक्षलवादी कमांडर हिडमा यांच्या मृत्युनंतर भूपतीने हे आवाहन केले. गेल्या काही दिवसांपासून आम्हाला चकमकींच्या बातम्या येत आहेत. ही एक अतिशय चिंताजनक बाब आहे. मी तुम्हाला सांगू इच्छितो की, आम्ही सुमारे दीड महिन्यांपूर्वी सशस्त्र संघर्ष सोडला आहे. आम्हाला समजले की, बदलत्या परिस्थितीत आपण पुन्हा सशस्त्र संघर्ष करू शकत नाही. आम्ही आता संविधानानुसार लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी काम करत आहोत. नक्षलवादी चळवळीचे सशस्त्र संघर्षात मोठे नुकसान झाले आहे. बदलत्या परिस्थिती लक्षात घेता, शस्त्रांनी लढण्यापेक्षा आपण सशस्त्र संघर्ष सोडून मुख्य प्रवाहात सामील व्हावे आणि लोकांसोबत काम करावे, असे भूपती म्हटले आहे.