अशी आहे गडचिरोलीमधील कोरोना परिस्थिती; पहा खास रिपोर्ट!

Updated On:

गडचिरोली : कुरखेडा व चामोर्शी तालुक्यात कोरोनाचे ५ रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आल्यानंतर सतर्कतेचा भाग म्हणून प्रशासनाने आज जिल्ह्यातील १० ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केली आहेत. पोलिसांनी आज संध्याकाळी ही ठिकाणे प्रतिबंधीत केली असून, नागरिकांचे आवागमन बंद करण्यात आले आहे.आज संस्थात्मक विलगीकरणात असलेले कुरखेडा तालुक्यातील ४ व चामोर्शी तालुक्यातील १ असे ५ जण कोरोना पॉझिटीव्ह आढळले आहेत.


त्यामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली. प्रशासनानेही कठोर पावले उचलत निर्बंध आणखी कडक केले. याचाच एक भाग म्हणून कुरखेडा शहरातील शासकीय मुलांचे वसतिगृह परिसर, शासकीय मुलींचे वसतिगृह परिसर, गांधीवॉर्ड, येंगलखेडा हे संपूर्ण गाव, नेहारपायली हे संपूर्ण गाव, चिचेवाडा हे संपूर्ण गाव कंटेनमेंट झोन जाहीर करण्यात आले आहे.

शिवाय चामोर्शी तालुक्यातील मार्कंडादेव येथील शासकीय माध्यमिक आश्रमशाळा परिसर व लगतचा निवासी भाग, मुलचेरा तालुक्यातील विश्वनाथनगर गावच्या उत्तरेकडे सुखदेव प्रल्हाद व शेखर गोविंदा मंडल यांच्या घराजवळचा परिसर, विश्वनाथनगर येथील दक्षिणकेडे संतोष राजन सरकार व नवीन नित्यानंद सरकार यांच्या घराजवळचा परिसर, तसेच विश्वनाथनगर येथील पूर्वेकडे दीपक दत्ता व जोदुनाथ राजन मिस्त्री यांच्या घराजवळचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करुन तेथे नाकेबंदी करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.कुरखेडा येथील गांधी वॉर्ड (बुरड मोहल्ला) या भागात एक प्रवासी वाहतूक करणारा वाहनचालक वास्तव्य करतो.

त्यानेच १२ मजुरांना संस्थात्मक विलगीकरणासाठी आपल्या वाहनातून नेले होते. हे मजूर एकाच वाहनात गर्दीने बसले होते आणि त्यातील चार जण कोरोना पॉझिटीव्ह आढळून आले. त्यामुळे या वाहनचालकालाही कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका लक्षात घेता आरोग्य विभागाने त्याचे स्वॅब नमुने घेऊन ते तपासणीसाठी पाठविले आहेत. हा वाहनचालक अनेकांच्या संपर्कात आला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे तो वास्तव्य करीत असलेला भूभाग पोलिसांनी आज संध्याकाळी सील केला. शिवाय संस्थात्मक विलगीकरण असलेला भाग कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे.

आणखी संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : बिरसा मुंडा यांनी आदिवासींचा स्वाभिमान पुनरुज्जीवित केला; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले मत

2026-11-15 18:51:04

Devendra Fadnavis : बिरसा मुंडा यांनी आदिवासींचा स्वाभिमान पुनरुज्जीवित केला; देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले मत

Jual Oram : पंतप्रधानांच्या प्रयत्नांने 50 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर; केंद्रीय मंत्री जुआल ओरम यांचा दावा

2026-11-15 16:00:42

Jual Oram : पंतप्रधानांच्या प्रयत्नांने 50 कोटी लोकांना गरिबीतून बाहेर; केंद्रीय मंत्री जुआल ओरम यांचा दावा

PM Narendra Modi : "आदिवासी संकटात असताना तत्कालीन सरकारे मौन बाळगून होते, पण आता..." पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा

2026-11-15 12:53:05

PM Narendra Modi : "आदिवासी संकटात असताना तत्कालीन सरकारे मौन बाळगून होते, पण आता..." पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर निशाणा

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

2026-07-30 09:01:59

Maharashtra Rain : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता; शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर

Political News : खळबळजनक ! भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्याला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?

2026-06-30 16:55:15

Political News : खळबळजनक ! भाजपमधून हकालपट्टी करण्यात आलेल्या नेत्याला अटक; काय आहे नेमकं प्रकरण?