गडचिरोली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शहिदांना श्रद्धांजली

गडचिरोली – महाराष्ट्र दिनीच गडचिरोलीतील कुरखेडा तालुक्यातील दादापूर मार्गावर नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोट घडवला होता. नक्षलवाद्यांनी सी-६० कमांडो जवानांच्या ताफ्यावर आयईडी स्फोटकांद्वारे भ्याड हल्ला केला होता, या  हल्ल्यात १५ जवान शहीद झाले होते. त्यानंतर आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोली पोलीस मुख्यालयात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी केंद्रीय गृह राज्य मंत्री हंसराज अहिर हे देखील उपस्थित होते. तर राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांनी देखील घटनास्थळी जाऊन या घटनेची पाहणी केली.

दरम्यान, गडचिरोलीत २४ तासात नक्षलवाद्यांनी केलेला हा दुसरा हल्ला आहे. दरम्यान, नक्षलवाद्यांनी मंगळवारी ३० एप्रिल रोजी रात्री धुमाकूळ घालत रस्त्याच्या कामासाठी आणलेली तब्बल ३० वाहने पेटवून दिली होती. नक्षलवाद्यांनी जाळपोळ केलेली वाहने जवळपास दहा ते १२ कोटी रुपयांची होती.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.