Marathi Movie: खुळ्यागत फॅमिलीची श्टोरी! ‘फसक्लास दाभाडे’चा हटके टीझर आला समोर

Fussclass Dabhade Marathi Movie Teaser : गेल्याकाही दिवसांपासून ‘फसक्लास दाभाडे’ या मराठी चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. चित्रपटातील ‘यल्लो यल्लो’ हे गाणे सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. नुकताच या चित्रपटाचा टीझर समोर आला असून, येत्या 24 जानेवारीला या चित्रपटाच्या माध्यमातून दाभाडे कुटुंब प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
‘फसक्लास दाभाडे’ चित्रपटात सोनू, पप्पू, तायडी या इरसाल भावंडांची आणि त्यांच्या कुटुंबाची गोष्ट पाहायला मिळणार आहे. टीझरमध्ये दाभाडे कुटुंबातील सदस्यांमधील भांडणे, कुरबुरी, प्रेम आणि घट्ट बॉण्डिंग पाहायला मिळत आहे.
View this post on Instagram
या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि लेखन हेमंत ढोमेने केले आहे. चित्रपटाची माहिती देताना हेमंत ढोमे म्हणाला की, ‘फसक्लास दाभाडे’ हा फक्त एक चित्रपट नाही तर कुटुंबातील विविध पैलूंना हसत-खेळत उलगडणारी एक सफर आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यातल्या जुन्या क्षणांचा, आपल्या कुटुंबाच्या प्रत्येक आठवणींना उजाळा देणारा एक फोटो अल्बमच आहे.’
दाभाडे कुटुंबांची कथा 24 जानेवारी 2025 ला प्रेक्षकांना मोठ्या पडद्यावर पाहायला मिळेल. भूषण कुमार, कृष्ण कुमार, आनंद एल राय आणि क्षिती जोग हे चित्रपटाचे निर्माते आहेत. तर क्षिती जोग, सिद्धार्थ चांदेकर, अमेय वाघ, निवेदिता सराफ, हरिष दुधाडे, राजन भिसे, राजसी भावे या कलाकार चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसतील.





