फुरसुंगी : नव्याने निर्माण झालेल्या फुरसुंगी देवाची नगर परिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) ने नगराध्यक्षपदासह 32 पैकी 19 जागा जिंकत शिवसेनेचे आमदार विजय शिवतारे व भाजपाचे माजी आमदार संजय जगताप यांना जोरदार धक्का देत या निवडणुकीत राष्ट्रवादीने निर्विवाद वर्चस्व मिळवले आहे. नव्याने स्थापन झालेल्या नगर परिषदेची निवडणूक अतिशय चुरशीची धक्कादायक निकालाची झाली, या निवडणुकीत अनेक दिग्गजांना पराभवाचा धक्का बसला आहे तर काहीजण अल्पमतांनी निवडून आले आहे. नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे संतोष सरोदे हे विजयी झाले आहेत. संतोष सरोदे यांना २०९०८ मते मिळाली तर शिंदे सेनेचे महेंद्र सरोदे यांनी १८०१० मते मिळवत कडवी झुंज दिली. तेच उबाठा सेनेचे सनी कांबळे यांना ६०५५ मते मिळाली. 32 सदस्य फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळवत १९ जागा मिळवले आहेत. शिवसेना (शिंदे) त्यांना ८ जागा मिळाल्या तर भारतीय जनता पार्टीला अवघ्या ५ जागांवर समाधान मानावे लागले. भाजपा शिवसेना युती असताना देखील नगराध्यक्ष पदासह बहुमत मिळवताही न आल्याने विद्यमान आमदार व नगरपरिषदेचे निर्माते विजय शिवतारे यांना व भाजपाचे माजी आमदार संजय जगताप यांना केवळ पाच जागा मिळाल्याने मोठा झटका लागला आहे. विजयी उमेदवार पुढील प्रमाणे प्रभाग क्रमांक १ अ- गिरीश कैलास ढोरे, १ ब स्नेहा सचिन हरपळे प्रभाग क्र. २ अ-उषा कैलास ढोरे, ब-सचिन नंदकुमार हरपळे प्रभाग क्र .३ अ-स्नेहल रामचंद्र जवंजाळ, ब-सचिन देवकाते प्रभाग क्र ४ अ-संभाजी कोंडीबा रोकडे, ब-विशाखा संदीप हरपळे प्रभाग क्र.५ अ-स्वाती लक्ष्मण आढाळे, ५ब-ओंकार मच्छिंद्र कामठे प्रभाग क्र ६ अ-महेश गुलाब हरपळे, ब-अमृता धनंजय कामठे प्रभाग क्र.७ अ-संतोष खंडू आबनावे, ब-राणी बाळासाहेब हरपळे प्रभाग क्र ८ अ-मोनिका निलेश पवार, ब-गणेश बाळासाहेब कामठे प्रभाग क्र ९ अ-सुधा संजय हरपळे, ब-गणेश बाळासाहेब ढोरे प्रभाग क्र. १० अ-सुकन्या प्रकाश शेवाळे, ब-अमित शंकर हरपळे प्रभाग क्र ११ अ-उषा नरसिंग ढमाळ, ब-अजिंक्य शिवाजी ढमाळ प्रभाग क्र.१२ अ-ॲड .अमोल कापरे, ब-प्राची देशमुख प्रभाग क्र. 13 अ-चंद्रकांत धोंडीबा ढमाळ, ब-भावना अजिंक्य ढमाळ प्रभाग क्र. 14-शितल अमित हरपळे, ब-संतोष रमेश हरपळे प्रभाग क्र 15 अ-शारदा भैरू भाडळे, ब-प्रशांत विलास भाडळे प्रभाग क्र 16 अ-पल्लवी गोरख आबनावे, ब-विकास विनायक भाडळे हे 32 उमेदवार या पहिल्याच निवडणुकीत विजयी झाले आहेत. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी चौकात चौकात फटाक्यांची आतिषबाजी व गुलालाची उधळण करत जोरदार विजय उत्सव साजरा केला. अनेक प्रभागांमध्ये क्रॉस वोटिंग झाल्याने दोन वेगवेगळ्या पक्षाचे उमेदवार विजयी झाले आहेत त्यामुळे विजयी झालेल्या उमेदवाराला ही मोकळ्या मनाने जल्लोष फारसा करता आला नाही. तर अनेक मातब्बर उमेदवारांचा या निवडणुकीत पराभव झाल्याचे दिसून येते. फुरसुंगी-उरुळी देवाची नगरपरिषदेच्या पहिल्याच निवडणुकीत दोन्ही गावच्या नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार) वर जो भरघोस विश्वास दाखवून नगराध्यक्षपदा सह 19 नगरसेवक निवडून दिले आहेत.आम्ही जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ करून दाखवू व उपमुख्यमंत्री अजितदादांच्या मार्गदर्शनाखाली या दोन्ही गावांचा सर्वांगीण विकास करुन दाखवू. गणेश ढोरे पॅनल प्रमुख व नवनिर्वाचित नगरसेवक