पुणे – शहनाझ गिलचा व्हिडिओ “त्वाडा कुत्ता, टॉमी, साडा कुत्ता, कुत्ता’ या गाण्यावर रविना टंडन आणि तिची कन्या राशा थडानी यांनी भन्नाट डान्स केलेला एका व्हिडिओ व्हायरल झाला आहे. रविनाने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा डान्स व्हिडिओ शेअर केला आहे.
यामध्ये रविना आणि राशा दोघी कुत्रे आणि मांजरांना उचलून घेऊन भन्नाट डान्स करताना दिसत आहेत. त्यांच्या हातातल्या पॉमेरियन कुत्र्यांनाही त्या दोघी या गाण्याच्या तालावर नाचवताना दिसत आहेत.
View this post on Instagram
मध्येच रविनाने आपल्या हातातल्या मांजराला चक्क कॅमेऱ्यासमोर उभे केले आणि त्याला गाणे म्हणायला लावल्याची ऍक्टिंगही केली. हे सगळे खूपच मजेदार होते. त्यामुळे फॅन्सनी या मजेदार व्हिडिओला मनपासून लाईक केले.
रविनाने हा व्हिडिओ पोस्ट करताना शहनाझ गिल आणि यशराज मुखाटे यांना टॅग़ केले आहे. “तुमचे गाणे खूपच कमाल आहे’ असे रविनाने म्हटले आहे. जोपर्यंत आपण हे गाणे बघितले नव्हते, तोपर्यंत आपल्याला इतके नाचावेसे वाटले नव्हते, असेही रविनाने म्हटले आहे. या गाण्यावर नाचताना रविना आणि राशा या दोघी चक्क फुगड्या घालतानाही दिसत आहेत.