खास शिक्षण व मार्गदर्शन केंद्राची स्थापनेसाठी निधी

पुणे – आदिवासी विकास विभागाच्या अधिनस्त काही शासकीय आश्रमशाळांना संलग्न व्यवसाय प्रशिक्षण केंद्र चालविण्यात येत आहेत. आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत सन २०२३-२४ या आर्थिक वर्षात खास शिक्षण व मार्गदर्शन केंद्राची स्थापना या योजनेंतर्गत निधी वितरण करण्यात येणार आहे.
यापैकी काही प्रशिक्षण केंद्रामध्ये सन २०२२-२३ व सन २०२३- २४ या वर्षात कार्यरत कर्मचान्यांच्या मानधनाकरीता निधी उपलब्ध करून देण्याबाबत आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांचा प्रस्ताव शासनास प्राप्त झाला होता. प्रस्तावास अनुसरून प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर याच्या अधिनस्त रूपापेठ येथील कर्मचाऱ्यांच्या कार्यरत असलेल्या कालावधीचे मानधन अदा करण्यासाठी आयुक्त, आदिवासी विकास नाशिक यांना निधी वितरीत करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.
१५ लाख ४८ ह्जार रुपयांचा निधी मंजुर करण्यात आला आहे. निधी अर्थसंकल्पीय निधी वितरण प्रणालीवर वितरीत करण्यात आला असून निधी सबंधित आहरण व संवित्तरण अधिकारी यांना वितरीत करण्यात यावा. निधी खर्च करतांना संबंधितामार्फत राज्यशासनाची कार्य नियमावली, वित्तीय नियमावली, अर्थसंकल्पीय नियम पुस्तिकेमधील विहीत तरतुदी व अटी शर्तीचे पालन करण्याची दक्षता घेण्यात यावी तसेच शासन परिपत्रकातील दिलेल्या निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे. उपलब्ध करुन दिलेल्या तरतुदीतून झालेल्या खर्चाचा अहवाल, निधी उपयोगिता प्रमाणपत्र आदी माहिती आदिवासी विकास विभागास पाठवावी व निधी उपयोगिता प्रमाणपत्रासह पुढील निधी वितरणासाठी प्रस्ताव सादर करावा लागणार आहे.





