Satara | येरणे बुद्रुक, येरणे खुर्द येथील पूर संरक्षण भिंतीसाठी निधी मंजूर

महाबळेश्वर, (प्रतिनिधी) – महाराष्ट्र कृष्णा खोरे पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत येरणे बुद्रुक येथील सोळशी नदीच्या बाजूला पूर संरक्षण भिंत बांधण्याच्या प्रस्तावास प्रस्ताविक पूर संरक्षण भिंत बांधण्याच्या कामासाठी 1 कोटी 56 लक्ष 67 हजार 715 व येरणे खुर्द नदीच्या बाजूला पूर संरक्षण भिंत बांधण्याच्या प्रस्तावास पूर संरक्षण भिंत बांधण्याच्या कामासाठी 1 कोटी 92 लाख 18 हजार 231 एवढ्या खर्चाच्या जलसंपदा विभागाच्या सन 2022- 23 व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या 2022 -2023 च्या दरसूचीवर आधारित अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात येत आली आहे.
हा निधी मिळवण्यात आ. मकरंद पाटील यशस्वी झाले आहे. त्यामुळे भविष्यात येणाऱ्या पूरजन्य परिस्थितीशी सामना करण्यासाठी संरक्षण भिंत बांधून मिळणार असून नदीकाठच्या गावांना पुरापासून संरक्षण मिळणार आहे.
येरणे बुद्रुक व येरणे खुर्द या गावामध्ये जुलै 2021 रोजी अतिवृष्टीमुळे पूरजन्य परिस्थिती होऊन शेतीचे, राहत्या घरांचे, रस्त्यांचे, सार्वजनिक इमारतींचे अतोनात नुकसान झाले होते.
यावर पूरजन्य परिस्थितीमुळे भविष्यात नुकसान होऊ नये म्हणून पूर संरक्षण भिंत करून मिळावी, अशी मागणी सभापती संजूबाबा गायकवाड यांनी केली होती. या मागणीचा पाठपुरावा आमदार मकरंद पाटील यांनी ही केला. त्यामुळे या मागणीला शासनाने हिरवा सिग्नल दिला.
येरणे खुर्द व मोजे येरणे बुद्रुक ही गावे महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम डोंगरदऱ्यामध्ये वसलेली आहते. ही गावे सोळाशी नदीच्या डाव्या तीरावर असून जुलै 2021 मधील अतिवृष्टीमुळे सोळशी नदीला अभूतपूर्व पूर येऊन येरणे खुर्द व मोजे येरणे बुद्रुक या गावचे शेतजमिनीचे अपरिमित नुकसान झाले होते.
नदीस वारंवार येणाऱ्या पुरामुळे नदीकाठ जमिनीची धूप होऊन वस्ती लगतच्या नदीकाठ व भूभाग अस्थिर होत असल्यामुळे पुराच्या पाण्यामुळे सोळशी नदीकाठी वसलेल्या गावठाणाच्या भागाचे संरक्षण करण्यासाठी पूर संरक्षण भिंतीचे काम करून मिळण्यासाठी आ. मकरंद पाटील यांच्यासह संजूबाबा गायकवाड , राजेंद्र राजपुरे , नितीन भिलारे ,प्रवीण भिलारे यांनी पाठपुरावा केला





