Upcoming IPO 2025: पैसे तयार ठेवा! नवीन वर्षात येतायत दिग्गज कंपन्यांचे IPO, दुप्पट मिळेल परतावा

Top IPOs to Watch Out for in 2025: वर्ष 2024 मध्ये अनेक कंपन्यांनी आयपीओ सादर केला आहे. या कंपन्यांमध्ये ह्युंडाईपासून ते NTPC Green Energy चा समावेश आहे. बहुतांश आयपीओमध्ये गुंतवणुकदारांना फायदाच झाल्याचे पाहायला मिळाले. तुम्ही जर नवीन वर्षात गुंतवणुकीचा विचार करत असाल तर चांगली संधी आहे. नवीन वर्षात अनेक मोठ्या कंपन्या आपला आयपीओ आणणार आहेत. वर्ष 2025 मध्ये जवळपास 1.5 लाख कोटी रुपयांचे आयपीओ बाजारात आणले जाऊ शकतात.
वर्ष 2025 मध्ये 34 कंपन्यांना आयपीओ सादर करण्यासाठी सेबीकडून मंजूरी मिळाली आहे. या कंपन्या आयपीओच्या माध्यमातून 41462 कोटी रुपये उभारतील. तर 55 कंपन्यांना अद्याप सेबीकडून मंजूरी मिळालेली नाही. या कंपन्या 98,672 कोटी रुपये उभारणार आहेत.
वर्ष 2024 मध्ये आयपीओची लागली रांग
रिपोर्टनुसार, वर्ष 2024 मध्ये आतापर्यंत 75 भारतीय कंपन्यांनी मेनबोर्ड आयपीओच्या माध्यमातून 1.5 लाख कोटी रुपये उभारले आहेत. 2023 मध्ये 57 आयपीओ आले होते. याद्वारे कंपन्यांनी 49,435 कोटी रुपये उभारले होते. तर 2020 मध्ये आलेल्या आयपीओचा आकडा 40 होता. वर्ष 2024 मध्ये सेबीकडे 143 ड्राफ्ट रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्सची (DRHP) नोंद करण्यात आली.
2025 मध्ये येणार फ्लिपकार्टचा आयपीओ
वर्ष 2025 मध्ये अनेक मोठ्या कंपन्यांचा आयपीओ येण्याची शक्यता आहे. यामध्ये Zepto, Flipkart, इंदिरा IVF आणि HDFC क्रेडिला सारख्या कंपन्यांचा समावेश आहे. रिपोर्टनुसार, झेप्टो आणि फ्लिपकार्ट सारख्या कंपन्यांची आयपीओद्वारे 1 अब्ज डॉलर उभारण्याची योजना आहे. याशिवाय, एचडीबी फायनेंशियल सर्व्हिसेज, एलजी इलेक्ट्रॉनिक्स इंडिया, एनएसडीएल, डॉ. अग्रवाल हेल्थ केअर, हेक्सावेअर टेक्नोलॉजीज, एथर एनर्जी, जेएसडब्ल्यू सिमेंट आणि हीरो फिनकॉर्पचा आयपीओ देखील नवीन वर्षात येण्याची शक्यता आहे.
(नोंद – शेअर मार्केट व इतर गुंतवणूक करण्याआधी वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच निर्णय घ्यावा.)





