वाल्हे (प्रतिनिधी) – वाल्हे येथे महात्मा फुले जयंतीनिमित्त महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वाल्हे (ता. पुरंदर ) येथे प्रथमच महात्मा फुले जयंती साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा बॅकेच माजी अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी, पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी अध्यक्ष प्रा.डॉ. दिगंबर दुर्गाडे, सरपंच अमोल खवले व उपसरपंच सुर्यकांत भुजबळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी प्रा. दुर्गाडे यांनी सरपंच, उपसरपंच यांना कोरोनाच्या नियंत्रणासाठी वाल्हे ग्रामपंचायतीने केलेल्या कामाचा आढावा घेऊन, सर्व ग्रामस्थांनी आपल्या घरामधून बाहेर न पडता, प्राशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी केले.