नवी दिल्ली : देशात एकीकडे करोनामुळे अर्थव्यवस्था पूर्णपणे कोलमडून गेली आहे. तर दुसरीकडे दुसरीकडे सामान्यांच्या खिशाला इंधन दरवाढीमुळे कात्री लागली आहे. कारण आज सलग बाराव्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ झाली आहे.
Petrol and diesel prices at Rs 77.81/litre (increase by Re 0.53) and Rs 76.43/litre (increase by Re 0.64), respectively in Delhi today. pic.twitter.com/nkCvsbZkuT
— ANI (@ANI) June 18, 2020
आज दिल्लीत पेट्रोलचे दर ७७ रुपये ८१ पैसे, तर डिझेलचे दर ७६ रुपये ४३ पैसे झाले आहेत. तर, मुंबईत पेट्रोल ८४.६५ रुपये प्रति लिटर व डिझेल ७४.९१ रुपये प्रति लिटर, तर पुण्यात पेट्रोलचा आजचा दर ८४.३८ पैसे प्रति लिटर व डिझेलचा दर ७३.५४ रुपये प्रति लिटर आहे.
आज पेट्रोलच्या दरात ५३ पैसे व डिझेलच्या दरात ६४ पैशांनी वाढ झाली आहे. या अगोदर बुधवारी पेट्रोलच्या दरात दिल्लीत ५५ पैशांची तर डिझेलच्या दरात ६९ पैशांची वाढ करण्यात आली होती. देशातील प्रमुख शहरांपैकी चेन्नईत पेट्रोल -८१.३२ रुपये प्रति लिटर व डिझेल ७४.२३ लिटर आहे. याचबरोबर कोलकातामध्ये पेट्रोल ७९.५९ रुपये व डिझेल ७१.९६ रुपये लिटर आज झाले आहे.
दररोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत बदल करण्यात येतो. तसेच सकाळी सहा वाजल्यापासूनच हे नवे दर लागूही करण्यात येतात. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात एक्साइज ड्युटी, डिलर कमीशन आणि अन्य बाबींचा समावेश केल्यानंतर याचे दर जवळपास दुप्पट होतात. दरम्यान, काही दिवसापूर्वी सोनिया गांधी यांनी याच मुद्द्यांवरून पंतप्रधान नरेंद्र मोदी याना पत्र लिहून इंधन दरवाढ मागे घेण्याची मागणी केली होती.