तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर मोदी पहिला परदेश दौरा कोणत्या देशातून करणार ?

PM Modi Foreign Visits| नरेंद्र मोदींनी 9 जून रोजी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. याशिवाय मंत्र्यांचे खाते वाटप देखील झाले आहे. यानंतर पंटप्रधान नरेंद्र मोदी यांच्या परदेश दौऱ्यावरून नेहमीच चर्चा रंगलेली असते. इतकेच काय मोदींच्या या परदेश दौऱ्यावरून अनेकदा विरोधकांकडून टीकाचा सामनाही करावा लागतो. यातच आता ते तिसऱ्या टर्ममध्ये कोणत्या देशापासून परराष्ट्र दौऱ्याची सुरुवात करणार? असा सवाल उपस्थित केला जात आहे. याबाबत अनेकांना उत्सुकता लागली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी 2014 साली पहिल्यांदा पंतप्रधान झाले, तेव्हा त्यांनी भूतानचा पहिला परदेश दौरा केला होता. त्यानंतर 2019 साली पुन्हा सत्तेवर आल्यानंतर त्यांनी मालदीवचा पहिला परदेश दौरा केला होता. यावेळी पीएम मोदी यांच्या परदेश दौऱ्याची सुरुवात इटलीपासून होण्याची शक्यता आहे. यंदाच्या मोदींच्या शपथ विधी सोहळ्यासाठी बांगलादेश, श्रीलंका, मालदीव, भूतान, नेपाळ, मॉरिशसचे नेते या समारंभाला उपस्थित होते. PM Modi Foreign Visits|
दरम्यान, इटलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी G7 संमेलनात सहभागी होऊ शकतात. G7 संम्मेलन 13 ते 15 जून दरम्यान इटलीच्या बोर्गो एग्नाजिया (फसानो) मध्ये होणार आहे. पीएम मोदी 14 जूनला एक दिवसाच्या शिखर संमेलनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. परराष्ट्र मंत्रालयाने एका निवेदनात पंतप्रधानांच्या दौऱ्याबद्दल माहिती दिली आहे. PM Modi Foreign Visits|
इटलीला यावर्षी 1 जानेवारीला G7 च अध्यक्षपद मिळाले आहे. या शिखर परिषदेतआंतरराष्ट्रीय व्यापार, हवामान बदल आणि रशिया-युक्रेन युद्धाचे परिणाम, जागतिक आर्थिक परिस्थिती, इस्रायल- हमासमधील संघर्ष यासारख्या महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा होणार आहे.
हेही वाचा :
“आम्हाला बारामतीचा दादा बदलायचाय…” ; कार्यकर्त्यांची थेट शरद पवारांसमोर मागणी





