‘लोक एवढा काळा पैसा नेमका आणतात कुठून?’ धीरज साहूंचं जुनं ट्वीट व्हायरल; भाजपने साधला निशाणा

Dheeraj Sahu : काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज साहू (Dheeraj Sahu) यांच्या घरावर टाकलेल्या छाप्यांमध्ये आयकर विभागाने आतापर्यंत 300 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. धीरज साहू यांच्या घरावर आणि कार्यालयावर 6 डिसेंबर रोजी छापा टाकल्यानंतरही अद्यापही नोटांची मोजणी सुरू आहे. यादरम्यान काँग्रेस खासदाराचे एक जुने ट्विट व्हायरल होत आहे, ज्यामध्ये त्यांनी ‘नोटाबंदी’विरोधात पोस्ट लिहिली होती. यावरुन आता भाजपने धीरज साहू प्रकरणावरून पुन्हा एकदा काँग्रेसवर निशाणा साधला.
धीरज साहू यांचे व्हायरल होत असलेले हे ट्वीट त्यांनी 12 ऑगस्ट 2022 रोजी केलं होतं. “लोक एवढा पैसा नेमका आणतात कुठून, हे माझ्या लक्षातच येत नाही. या देशामध्ये जर कोणी भ्रष्टाचाराला आळा घालणार असेल तर तो फक्त काँग्रेस पक्ष आहे”, असं ट्वीट साहू यांनी केलं होतं. काँग्रेस खासदार धीरज साहू त्यांच्या जुन्या ट्विटमध्ये नोटाबंदीवर टीका करत आहेत.
ओह अब समझ आ रहा है कि धीरज साहू और कांग्रेस नोटबंदी का इतना विरोध क्यों कर रहे थे |
Corruption Ki Dukan me Beimani Ka Saaman
Now we can guess why Congress & Sahu were opposing note bandi !
1 MP = ₹500cr
52 MPs = ?????Congress = Ghotale ki guarantee pic.twitter.com/FD86kyZs2H
— Shehzad Jai Hind (@Shehzad_Ind) December 10, 2023
धीरज साहू यांचे ट्वीट शेअर करत भाजप नेते शेहजाद पूनावाला (Shehzad Jai Hind) म्हणाले की, “आता मला समजले आहे की धीरज साहू आणि काँग्रेस नोटाबंदीला एवढा विरोध का करत होते.” काँग्रेसवर टीका करताना त्यांनी असेही लिहिले की, जर एका खासदाराकडे 500 कोटी रुपये असतील तर किती? 52 खासदार आहेत का? काँग्रेस = घोटाळ्याची गॅरंटी.” काँग्रेस खासदारांच्या संपत्तीवर छापे घातले जात असताना साहू यांचे हे ट्विट व्हायरल होत असल्याने ते अधिक चर्चेत आले आहे.
दरम्यान, काँग्रेस नेते आणि राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्याशी संबंधित ओडिशा आणि झारखंडमधील अनेक ठिकाणी आयकर विभागाने टाकलेल्या छाप्यांमध्ये आतापर्यंत 300 कोटी रुपयांहून अधिक रोख जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेली रोकड मोजण्यासाठी अधिकाऱ्यांना मोठ्या प्रमाणात अधिकारी आणि कॅश मोजणी यंत्रे तैनात करावी लागली. साहू यांच्यावर चोरी आणि ‘ऑफ द बुक’ देवाण-घेवाणीचा आरोप आहे. या छापेमारीसाठी 80 लोकांच्या 9 टीम कार्यरत आहेत.





