Shura Khan : पहिल्या डेटपासून….शूरा खानने शेअर केला खास फोटो; अरबाजची प्रेमळ कमेंट; म्हणाला, ‘तू जशी…’
Shura Khan : शूरा खानने सोशल मीडियावर अरबाजसोबतचा एक सुंदर रोमँटिक फोटो शेअर केला आहे.

Shura Khan : अभिनेता अरबाज खान पहिली पत्नी मलायका अरोरापासून विभक्त झाल्यानंतर त्याची दुसरी पत्नी शूरा खानसोबत वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहे. अरबाज आणि शूरा यांची जोडी चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे. शूरा सोशल मीडियावर अनेकदा अरबाजसोबतचे खास फोटो शेअर करत असते. आता तिने शेअर केलेल्या एका रोमँटिक पोस्टने चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. विशेष म्हणजे, या पोस्टवर अरबाजने केलेली प्रेमळ कमेंट चर्चेत आहे.
शूराने शेअर केला रोमँटिक फोटो
शूरा खानने सोशल मीडियावर अरबाजसोबतचा एक सुंदर रोमँटिक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये दोघेही एकमेकांकडे पाहत हसताना दिसत आहेत. हा फोटो एखाद्या डेट नाईटमधील असल्याचे दिसते. दोघांचाही लूक अतिशय स्टायलिश आणि क्लासी आहेत.
अरबाजने काळ्या रंगाचा कॅज्युअल शर्ट परिधान केला आहे, तर शूरा फिकट निळ्या रंगाच्या स्लीव्हलेस हॉल्टर नेक आऊटफिटमध्ये दिसत आहे. मोकळे सोडलेले लांब केस, लाल रंगाचे नेलपेंट आणि हातातील अंगठी यामुळे शूराचा लूक आणखी आकर्षक दिसत आहे.
View this post on Instagram
शूराच्या पोस्टला अरबाजची रोमँटिक कमेंट
“माझ्या पहिल्या डेटपासून ते माझ्या कायमच्या पार्टनरपर्यंत. ती जागा जिथे या सगळ्याची सुरुवात झाली.” असे खास कॅप्शन शूराने पोस्टला दिले आहे.
शूराच्या या पोस्टवर अरबाजनेही प्रेमळ कमेंट केली. तो म्हणाला, “तू माझ्या आयुष्यात असल्याबद्दल मी किती कृतज्ञ आहे हे व्यक्त करण्यासाठी कधीकधी शब्द अपुरे पडतात. तुझ्या प्रेमाबद्दल, तुझ्या दयाळूपणाबद्दल आणि तू जशी आहेस त्याबद्दल धन्यवाद. तू जशी आहेस तशीच मला आवडतेस.”
कशी सुरू झाली अरबाज-शूराची लव्हस्टोरी?
अरबाज खान आणि शूरा खान यांनी २४ डिसेंबर २०२३ रोजी मुंबईत विवाह केला. ‘पटना शुक्ला’ या चित्रपटाच्या सेटवर दोघांची पहिली भेट झाली होती. याच भेटीतून त्यांची मैत्री वाढली आणि पुढे या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. लग्नानंतर ५ ऑक्टोबर २०२५ रोजी अरबाज आणि शूरा एका मुलीचे आई-वडील झाले. त्यांनी आपल्या मुलीचे नाव सिपारा खान ठेवले आहे.
मलायका अरोरासोबत घेतला होता घटस्फोट
अरबाज खानचे यापूर्वी अभिनेत्री मलायका अरोरासोबत लग्न झाले होते. दोघांना अरहान खान नावाचा मुलगा आहे. मात्र, वैयक्तिक कारणांमुळे दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला. ११ मे २०१७ रोजी मुंबईच्या कौटुंबिक न्यायालयाने त्यांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली.





